मनमाड : प्रतिनिधी
शहर व परिसरात श्रीरामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या यावेळी श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे येथील श्रीराम मंदिरात महाअभिषेक भजन, महाआरती यासह इतर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली सजीव देखाव्यांमुळे शोभायात्रा लक्षवेधी ठरली.
श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे यंदा रामनवमीनिमित्त आठवडे बाजार श्रीराम मंदीरात सकाळी ७ वाजता समितीचे सदस्यांच्या हस्ते महाअभिषेक पुजा संपन्न झाली. तसेच सामुहिक रामरक्षा पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला. तर दुपारी १२ वाजता रामजन्माचे भजन होवून श्रीरामजन्माचा कार्यक्रम संपन्न झाली. ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे यंदाही श्रीराम नवमी निमित्त श्रीराम रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या रथयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. रथयात्रा मार्गावर सुशोभीत रांगोळी तसेच ध्वजपथक ,सनई चौघडा, श्रीराम, लक्ष्मण, सीता यांचा सजीव देखावा, धार्मिक भजने व गाणी वाजवणारा डि.जे, ढोलपथक , बॅण्डपथक मिरवणूकीत होते. सियावर रामचंद्र की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. याच मिरवणुकीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरका अपमान नही सहेगा हिंदुस्थान आदी चित्ररथ, तर रामायणातील राम, सीता, लक्ष्मण असा जिवंत देखावा उभारण्यात आला होता. या उत्सवात गणेश धात्रक, नितीन पांडे, संतोष बळीद जय फुलवणी नारायण पवार, पंकज खताळ, कैलास भाबड किशोर पाटोदकर राजेंद्र पारिक, कल्पेश बेदमुथा, नितीन अहिरराव, पप्पू परब, राजेंद्र भाबड, गोविंद रसाळ, मयूर बोरसे, साईनाथ गिड गे, योगेश पाटील, राजू पवार, रमाकांत मंत्री, माधव शेलार, विजय मिश्रा, राजू पवार, प्रमोद पाचोरकर, नाना शिंदे, अमोल दांडगव्हाल, स्वराज देशमुख, सनी फसाटे आदी प्रमुख कार्यकर्त्य उपस्थित होते रथयात्रा मिरवणुकीत प्रमुख चौकांमध्ये फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर आतीषबाजी करण्यात आली. तर ठिकठिकाणी विविध संघटना व पक्ष यांच्यातर्फे श्रीराम रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील चौका चौकात चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Tags:
मनमाड