मनमाड : प्रतिनिधी
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाणिज्य विभाग आणि रेल्वे सुरक्षा बलाकडून धावत्या रेल्वे गाडीत आणि रेल्वे स्थानकातील विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एका दिवसात ( फ्लाईंग स्कॉड द्वारे ) भुसावळ विभागाने २४७८ विनातकीट प्रवाशांकडून १५ लाख ४४ हजार रुपये दंड वसुल केले. यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच चाप बसला आहे.
रेल्वेचा महसूल बुडवणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासन तिकीट तपासणी मोहीम राबवत असते.मध्य रेल्वे भुसावळ विभागातील सर्व रेल्वे स्थानकावर आणि प्रवाशी रेल्वे गाड्यामधील फुकट्या प्रवाश्याविरुद्ध एक दिवसीय तपासणी मोहीम राबवण्यात आली. मुंबई, औरंगाबाद, नागपूर, पुणे आदी विविध भागांत येणाऱ्या गाड्यांमधून तसेच रेल्वे स्थानकावर थांबल्या असता उतरणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे स्थानकावर अचानक धाड पडल्यावर विनातिकीट प्रवाशांचे धाबे दणाणून गेले होते.रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच भुर्दंड बसला आहे.
# भुसावळ विभागातील नाशिक, मनमाड, भुसावळ, खंडवा, आणि बडनेरा रेल्वे स्थानक आणि इगतपुरी – भुसावळ, भुसावळ ते अमरावती, खंडवा – भुसावळ स्थानका दरम्यान प्रवासी रेल्वे गाडीत एक दिवसीय तिकीट चेकिंग मोहीम राबीव्यात आले.वाणिज्य विभागातील कर्मचार, रेल्वे सुरक्षा बलाचे सुरक्षा रक्षक, रेल्वे कर्मचारी आणि २ वरीष्ट अधिकाऱ्यानी सहभाग घेत ४७ पथक तयार करून मध्य रेल्वे विभागात धावणाऱ्या जवळपास ९४ हुन अधिक प्रवासी रेल्वे गाड्या एक दिवसीय तपासणी( फ्लाईंग स्कॉड द्वारे )करण्यात आले.
# भुसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे प्रबंधक एस. एस.केडिया यांच्या अध्यक्षते खाली व भुसावळ विभागाचे मुख्य विभागीय वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गर्शनानुसार भुसावळ वाणिज्य विभाग व रेल्वे सुरक्षा बल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हि मोहिम राबिण्यात आले.
# प्रवास करताना योग्य ते तिकीट घ्या व ज्या क्लासचे तिकीट आहे त्या क्लास मध्ये प्रवास करावा. जर तिकिट लाईन मध्ये उभे न राहता तिकीट हवे असेल तर आपण युटीएस ॲपचा वापर प्रवाशांनी करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले.
फोटो : विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करताना वाणिज्य विभागाचे अधिकारी
Tags:
मनमाड