मनमाड : प्रतिनिधी
मनमाड - नांदगाव रोडवरील पानेवाडी शिवारात असलेल्या इंडियन ऑईल कंपनी प्रशासनाच्या मनमानी कारभारात विरोधातील इंधन वाहतूकदारांनी पुकारलेला संप सकारत्मक चर्चेनंतर गुरुवारी दुपारी मागे घेण्यात आल्याची माहिती संपकऱ्यांनी दिली.
शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या पानेवाडी येथील इंधन प्रकल्पातील इंडियन ऑइल कंपनीच्या टेंडर प्रक्रियेतील मनमानी कारभाराच्या निषेधार्थ कंपनीतून इंधन वाहतूकदारांनी अचानक संपाचे हत्यार उपसल्याने प्रकल्पातून होणारी इंधन वाहतूक ठप्प झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक होऊन सकारत्मक चर्चा होऊन संप मागे घेतल्याने इंधन पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.
परिसरातील पानेवाडी येथील इंडियन ऑइल इंधन कंपनी प्रशासन मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याने त्याचा फटका वाहतूकदारांना बसत आहे.खरेदी केलेले टँकर टेंडर प्रक्रियेत नाकारण्यात आल्याने वाहतूकदारांना मोठा फटका बसत आहे.त्याच्या निषेधार्थ वाहतूकदारांनी संप पुकारल्याने कंपनी परिसरात इंधन वाहतूक करणारे टँकर उभे करून ठेवण्यात आले होते. कंपनी प्रशासन वाहतूकदारांच्या मागण्या जोपर्यंत मान्य करणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार वाहतूकदाराने घेतल्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी कंपनी प्रशासनाने आज तातडीची बैठक घेऊन यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.आणि एक-दोन मागण्यांवर जागेवर निर्णय झाला.त्यामुळे सकारत्मक चर्चा झाल्याने संप मागे घेतल्याचे वाहतुकदारांचा वतीने नाना पाटील यांनी सांगितले.या बैठकीत इंडियन ऑईलचे प्रकल्पधिकारी,पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात,संजय पांडे,सुरेश कुटे,नाना पाटील,संतोष सांगळे,अभय महाले,संतोष दिंडे,चंदु पालखडे,प्रदीप वाघ, समाधान आहेर,शंकर सांगळे, नितीन ज्ञानेश्वर,अंबु तेजवानी,इमरान काद्री आदी उपस्थित होते.
Tags:
मनमाड