मनमाड : प्रतिनिधी
करंजवण - मनमाड पाणीपुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले असून मनमाडकरांना आता पाण्यासाठी महिनाभराची प्रतीक्षा करावी लागणार नसून दररोज पाणी मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले..आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून करंजवण - मनमाड पाणीपुरवठा योजनेसह, नांदगाव येथील शिवसृष्टी व विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते मनमाड येथे संपन्न झाला.
पाण्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर मनमाडकर एवढे दिवस का थांबले असा सवालही मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला.आमच्यावर अनेक आरोप होतात, मात्र त्या आरोपाचे उत्तर आम्ही कामाच्या माध्यमातून देत आहोत..डबल इंजिन असलेले आमचे राज्यातील व केंद्रातील सरकार हे सर्वच घटकांचा सर्वांगीण विकास करत आहे..यावेळी मनमाड नगरपरिषद कार्यालयासाठी तातडीने १० कोटी रुपये व एम.आय.डी.सी. साठी येत्या महिनाभरात भूसंपादनाचे काम सुरू करण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले...मागील सरकारच्या अडीच वर्ष काळातील बंद पडलेल्या सर्व योजना आम्ही मार्गी लावल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले..या उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत आदी उपस्थित होते...
Tags:
मनमाड