मनमाड : प्रतिनिधी
बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाला निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्य बाण चिन्ह जाहीर केल्याने नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांच्या मनमाड येथील मालेगाव चौफुली येथे असलेल्या संपर्क कार्यालयात आनंद उत्सव साजरा करण्यात आला.ढोल ताशांचा गजरात ठेका धरत, फटाक्यांच्या आतिषबाजीत पेढे वाटत आमदार सुहास कांदे व शिवसैनिकांनी आनंद साजरा केला. यावेळी सर्व शिवसेना, युवा सेना व महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी आमदार सुहास कांदे यांचे अभिनंदन केले.
देशात व राज्यात कायदा सुव्यवस्था आहे. न्यायाने पक्षचिन्ह म्हणून धनुष्यबाण मिळाले आहे. ज्यांच्याकडे बहुमत असेल मूळ पक्ष आणि चिन्ह त्यांनाच मिळते असे अनेक उदाहरणं देखील आहेत. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्ववादाचे धनुष्यबाण असून सर्व शिवसैनिकांचे धनुष्यबाण आहे.येत्या काळात धनुष्यबाण चिन्हाच्या नेतृत्वाखाली सत्ता येईल, असे पत्रकारांशी बोलताना आमदार सुहास कांदे यांनी सांगितले.
Tags:
मनमाड