BHUMIPUTRA

आ.कांदे यांची सात्वंन भेट ; कुटुंबियांना एक लाख रुपये आणि चार महिनेचे धन्य,किराणा भेटA. Kande's consolation visit; One lakh rupees and four months of blessings, gift of groceries to the family
मनमाड : विशेष प्रतिनिधी

लोकेश सोनवणे या बालकाला लवकर न्याय मिळावा यासाठी केस फास्टट्रॅकमार्फत चालावी त्यासाठी एड उज्वल निकम यांनी केस लढवावी यासाठी प्रयत्न करणार आहे. आरोपीला फाशीची शिक्षा होईल असा पाठपुरावा करेन असे आश्वासन आमदार सुहास कांदे यांनी सोनवणे कुटुंबियांना दिले. यावेळी एक लाख रोख रक्कम आणि चार महिन्यांचे धान्य, किराणा भेट देण्यात आला.


लोकेश सोनवणे हत्याकांड झाल्याची घटना घडली असता आज आमदार सुहास कांदे, सौ अंजुम कांदे  यांनी सोनवणे कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, लोकेशची हत्या होणे ही अतिशय हृदयद्रावक घटना आहे. घडलेल्या घटनेबाबत दुःख व्यक्त करत आपण सदर घटना विशेष केस म्हणून फास्टट्रॅक मार्फत चालवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच विशेष सरकारी वकील एड उज्वल निकम यांच्या सारख्या दर्जेदार वकिलांनी या केसचे काम पहावे प्रयत्न करणार आहे. आरोपीस फाशीचीच शिक्षा होईल असा पाठपुरावा देखील करणार असल्याचा शब्द आमदार कांदे यांनी सोनवणे कुटुंबीयांना दिला. सोनवणे कुटुंब हे कष्टकरी असल्यामुळे परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने या कुटुंबाला हातभार लागावा यासाठी  सौ.अंजुम कांदे यांनी मुलाच्या आईकडे रोख एक लाख रुपये आणि चार महिने पुरेल इतका धान्य आणि किराणा सामुग्री दिली. पोलिसांनी तात्काळ या घटनेतील आरोपीला शोधून काढल्याबद्दल आमदार कांदे यांनी कौतुक केले. यावेळी तहसीलदार सिद्धार्थ मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंग साळवे, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, मुख्याधिकारी डॉ.  सचिनकुमार पटेल यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख साईनाथ गीडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, जेष्ठ नेते राजेंद्र भाबड, उप जिल्हाप्रमुख सुनील हांडगे, आमीन पटेल, राकेश ललवाणी, महीला आघाडी उपजिल्हा प्रमुख उज्वला खाडे, तालुकाप्रमुख विद्या जगताप, शहरप्रमुख संगीता बागुल, पूजा छाजेड, वंदना शिंदे, राधाबाई मोरे, सुभाष माळवतकर, दिनेश घुगे, गुलाब जाधव, काळू माळी, गोकुळ परदेसी, लाला नागरे, आप्पा आंधळे, दादा घूगे, लोकेश साबळे, मूकूद झालटे, मिलींद पाथरकर, अज्जू शेख, सिध्दार्थ छाजेड, आजिंक्य साळी, सचिन दरगुडे, आनंद दरगुडे, ललीत रसाळ यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते  उपस्थित होते.

फोटो
मनमाड : सोनवणे कुटुंबियांचे सांत्वन करतांना आमदार सुहास कांदे, सौ. अंजुम कांदे आदी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA