BHUMIPUTRA

नागापुर ग्रामपंचायत निवडणुकीत ९१ टक्के मतदान ; निकालाकडे लागले लक्ष


मनमाड : इंधन कंपन्यामुळे नावारुपास आलेल्या आणि जिल्हात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या मनमाड - नांदगाव रोडवर असलेल्या नागापूर ग्रामपंचायतीची आज १८ तारखेला अटीतअटींने निवडणूकीचे मतदान पार पडले.थेट सरपंच पदासाठी चुरस दिसून आली.राजीकय दृष्ठ्या जागरूक असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान नागापुर ग्रामपंचायतील एकुण २००९ पैकी १८३० मतदान झाले असून यामध्ये पुरुष ९७१ तर ८७९ स्त्रीयांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण ९१ टक्के इतके मतदान झाले.
   
        ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी नाट्यमय घडामोडीच्या माघारीनंतर तीन सदस्य बिनविरोध निवड झाल्यानंतर आज थेट संरपंच आणि सहा सदस्य पदासाठी मतदान झाले.गेली आठ दिवस ऐन थंडीत वातावरण गरम होऊन प्रचाराचा धुरळा उडाला होता.त्यामुळे सदरची निवडणूक रंगतदार आणि अटीटीची होणार असल्याची चर्चा होतीच.आज सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले असून मंगळवार(२०डिसेंबर) रोजी मतदान मोजणी होणार आहे.
         थेट संरपंच पदासाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात असून माजी आ.संजय पवार यांच्या बाजूने माजी संरपंच अशोक पांडुरंग पवार हे उमेदवार असून त्यांच्या विरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र सयाजी पवार उमेदवार असून रघुनाथ सोमासे हे तिसरे उमेदवार आहे.

प्रभाग क्र.१ मध्ये अनुसूचित जाती राखीव जागेसाठी विजय मोतीराम नगे व रविंद्र बाबुराव नगे यांच्यात लढत होत आहे.याच प्रभागात सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी कावेरी विष्णू पवार,केशरबाई भिवलाल पवार, कांचन प्रकाश पवार या महिलांमध्ये सामना होत आहे. 

प्रभाग क्र.२ मध्ये सर्वसाधारण जागेसाठी प्रकाश सखाराम जिरे, निलेश सुधाकर पवार,शोभाबाई अशोक पवार यांच्यात लढत होत आहे.

प्रभाग क्र.३ मध्ये अनुसूचित जाती महिला राखीव जागेसाठी विद्या सचिन देवरे,मंगल विजय नगे यांच्यात सरळ लढत होत आहे.तर सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी रंजना संजय पवार,स्नेहल विजय पवार यांच्यात सरळ सामना होत आहे.  


 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA