BHUMIPUTRA

विनातकीट प्रवाशांकडून २३ लाख २७ हजारांचा दंडवसुल


मनमाड : सध्या जवळपास सर्वच रेल्वेगाड्या धावू लागले असुन सध्या सण उत्सवाचे दिवस सुरू असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाणिज्य विभाग आणि रेल्वे सुरक्षा बलाकडून धावत्या रेल्वे गाडीत आणि रेल्वे स्थानकातील विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एका दिवसीय विशेष मोहीमेत ( फ्लाईंग स्कॉड द्वारे ) भुसावळ विभागाने ३९१५ विनातकीट प्रवाशांकडून २३ लाख २७ हजार ८६ रुपये दंड वसुल केले. तर भुसावळ विभागातील मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकात विनातिकिट प्रवास करणाऱ्या ५७ प्रवाशांकडून ३६ हजार १६० रुपये दंड वसूल केले.यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच चाप बसला आहे.
            रेल्वेचा महसूल बुडवणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासन तिकीट तपासणी मोहीम राबवत असते.मध्य रेल्वे भुसावळ विभागातील सर्व रेल्वे स्थानकावर आणि प्रवाशी रेल्वे गाड्यामधील फुकट्या प्रवाश्याविरुद्ध एक दिवसीय तपासणी मोहीम राबवण्यात आली. मुंबई, औरंगाबाद, नागपूर, पुणे आदी विविध भागांत येणाऱ्या गाड्यांमधून  तसेच रेल्वे स्थानकावर थांबल्या असता उतरणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे स्थानकावर अचानक धाड पडल्यावर विनातिकीट प्रवाशांचे धाबे दणाणून गेले होते.रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच भुर्दंड बसला आहे.
             भुसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे प्रबंधक एस. एस.केडिया यांच्या अध्यक्षते खाली व भुसावळ विभागाचे मुख्य विभागीय वाणिज्य प्रबंधक डॉ.शिवराज मानसपुरे यांच्या मार्गर्शनानुसार भुसावळ वाणिज्य विभाग व रेल्वे सुरक्षा बल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हि मोहिम राबिण्यात आले.

चौकट :
# भुसावळ विभागातील नाशिक, मनमाड, भुसावळ, खंडवा, आणि बडनेरा रेल्वे स्थानक आणि या मार्गावरून धावणाऱ्या ८६ प्रवासी रेल्वे गाड्यामध्ये एक दिवसीय तपासणी मोहिम राबीण्यात आली. यामध्ये ३ वरीष्ठ अधिकारी, १८० तिकिट तपासणी निरीक्षक, वाणिज्य विभागातील ४५ कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा बलाचे ५५ असे एकुण २८० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत ४ ते ६ व्यक्तीचे जवळपास ५६ पथक तयार करून मोहीम यशस्वी केले.
          
कोट : सण उत्सवानिमित्त आणि पर्यटनासाठी नागरीक बाहेर पडत असल्यामुळे सध्या सर्वच प्रवास रेल्वे गाड्यांना प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावे.- डॉ. शिवराज मानसपुरे, वाणिज्य प्रमुख, भुसावळ मडंळ


 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA