BHUMIPUTRA

सालाना जोड मेला उत्सहात संपन्न; हेलिकॉप्टर ठरले प्रमुख आकर्षणमनमाड : देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या शीख धर्मियांचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या मनमाड येथील गुरुद्वारा गुपत्सर अर्थात मनमाड गुरुद्वारा रविवारी सालाना जोड मेला व गुरुगादी स्मृतिदिन सोहळा उत्साहात संपन्न झाला.यानिमित्त देशाच्या विविध राज्यातुंन तसेच महाराष्ट्रातील विविध भागातुन हजारो शिख बांधवांनी येथे हजेरी लावली.
     दुपारी गुरुद्वारातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली सनई, चौघडा,नगारा ,भजनी पथक, धार्मिक गीते,फूलांनी सुशोभित चित्ररथात पवित्र गुरु ग्रंथ साहेब, गुरु गोविंदसिंह यांची प्रतिमा व त्यापुढे पंचप्यारे,पंचनिशाण समोर सत नाम वाहे गुरु  ,बोले सो निहाल-सत श्री अकाल चा जयघोष करणारे हजारो शिख बांधव, महिला असे या मिरवणुकीचे स्वरूप होते.
          मिरवरणुकित सहभागी झालेल्या युवकांनी तलवारबाजी,दाण्डपट्ट,रिंगण फिरविणे, नाचनारा अश्व अशी चित्तथरारक  प्रात्यक्षिके  सादर करूंन नागरिकांचे लक्ष्य वेधुन घेतले.प्रमुख रस्ते आणि चौकातुन सर्व धर्मीय बांधवांनी या शोभायात्रेचे स्वागत केले. ठिकठिकाणी सहभागी बांधवाना चहा,नाश्ता व जलपानाची व्यवस्था करण्यात आली होती.
                    गुरुद्वारात या शोभायात्रेचा सायंकाळी समारोप झाला. ततपूर्वी या सालाना जोडमेलानिमित्त गुरुद्वारात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अखंड पाठाची समाप्ति झाली.रविवारी पहाटे गुरूवाणी ने या कार्यक्रमाला प्रारम्भ झाला त्यानंतर देशाच्या विविध भागातुन आलेल्या भजनी मंडळनी आपली सेवा येथे रुजू केली दुपारी महाप्रसाद लंगर  चा भव्य कार्यक्रम झाला त्यात सर वधर्मिय भाविक सहभागी झाले होते.
           नांदेड येथील संत बाबा नरेंद्रसिंघजी ,बाबा बलविंदरसिंघजी यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रंणजीतसिंघजी यांनी या सर्व कार्यक्रमांचे संयोजन केले. सकाळपासुनच मनमाड गुरुद्वाराचा परिसर भाविकांनी गजबजून गेला. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. या उत्सवानिमित्त गुरुद्वाराला आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली होती.


चौकट : शहरातील गुरूद्वारा येथून य निघालेल्या शीख धर्मियांच्या या शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यासाठी खास नवी दिल्लीहुन मागविण्यात आलेले हेलिकॉप्टर हे प्रमुख आकर्षण ठरले.मिरवणूक मार्गावर व चौका -चौकात त्यावरून  या शोभायात्रेवर पुष्पवृष्टी झाली. सुमारे १ लाख ११ हजार रूपये यासाठी धार्मिक कार्यक्रम म्हणून  घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.


 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA