BHUMIPUTRA

शहरातील तुळजाभवानी मंदिर प्रवेशद्वाराचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटनInauguration of Tuljabhavani temple entrance in the city by MLA Kandeभूमिपुत्र न्यूज नेटवर्क
मनमाड : विशेष प्रतिनिधी


माऊली नगर मनमाड येथील तुळजाभवानी मंदिर प्रवेशद्वाराचे उद्घाटन नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी मंदिरासाठी त्वरित सभामंडप देण्याचे त्यांनी जाहीर केले. मंदिरात आई तुळजाभवानी मातेची आमदार सुहास कांदे यांनी मनोभावे आरती केली. परिसरातील नागरिकांशी बोलताना काहीही अडचण असल्यास निसंकोच संपर्क करा मी व आम्ही सर्व शिवसैनिक आपल्या सेवेत हजर आहोत असेही त्यांनी सांगितले.

दत्तात्रय शेळके दिलीप ठाकरे प्रकाश दराडे विनोद काकड दीपक वाघ रमेश आव्हाड विष्णू लटपटे मयूर शेळके वीरेन ठाकरे श्रावण भडांगे शांतनू काकड किरण भडांगे कृष्णा जाधव शिवाजी उगले शब्बीर शेख रुपेश आहेर ऋषिकेश बनकर ऋषभ छाजेड प्रसाद शिरसाठ अशोक कदम बापू गरुड आदि सह
याप्रसंगी माऊली नगर परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
    

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA