BHUMIPUTRA

पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न ; कसा करणार दिवाळीचा जश्न

 



मनमाड : नरहरी उंबरे

 'केरसुणी' अर्थात 'लक्ष्मी'ला आजही मागणी कायम असल्याने केरसुनी बनवनारे जगून आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रथम या लक्ष्मीची पुजा करून इतर वस्तूंची पुजा केली जाते.त्यामुळे या लक्ष्मीला विशेष महत्त्व आहे.
  दिवाळीच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाला केरसुणीची पूजा करण्याची प्रथा आहे.सर्वच भागात आजही ही प्रथा कायम आहे.लॉकडाऊनच्या काळात या केरसुणी विकणाऱ्यांना मोठा फटका बसला होता.मात्र यावर्षी कोरोना काहिअंशी कमी झाल्याने या लोकांना गावोगावी फिरुन व्यवसाय करता आला.त्यामुळे गेल्यावर्षीची दिवाळी अंधारात गेली होती.यंदा दिवाळीमध्ये निर्बंध शिथिल झाल्याने सर्वत्र खरेदीसाठी गर्दी आहे.पूजनासाठी केरसुणीला आजही मोठे महत्व आहे.केरसुणीला लक्ष्मी मानून पूजा करण्याची प्रथा असल्याने लक्ष्मी अर्थात केरसुणीचे दर यंदा दहा टक्‍क्‍यांनी वाढले आहेत.आता हा व्यवसाय पूर्वपदावर आला असला तरी कारागीर मात्र अडचणीत सापडले आहेत.केरसुणी तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल आणि इतर साहित्य उत्पादन खर्च वाढल्यामुळे केरसुणी बनवणाऱ्या कारागिरांची मात्र गोड होऊ शकलेली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA