BHUMIPUTRA

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आणि गर्दीच्या अनुषंगाने स्थानक परिसरात तपासणी मोहीम


 

मनमाड : कोरोना महामारी नंतर यंदा सर्वच सण उत्सव निर्बंध मुक्त वातावरणात साजरे केले जात आहे.याच अनुषंगाने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे सुरक्षा बल लोहमार्ग पोलीस आणि बॉम्ब शोध पथक यांच्या संयुक्त विद्यमानाने मनमाड रेल्वे जंक्शन स्थानक आणि परिसरात तपासणी मोहीम राबविण्यात आली.
           दिवाळी सणा निमित्त लागलेल्या शालेय सुट्ट्या आणि परगावी जाण्यासाठी मनमाड रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सध्या दिसून येत आहे याच अनुषंगाने रेल्वे स्थानक परिसरात कोणतेही अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता रेल्वे सुरक्षा बल,लोहमार्ग पोलीस, मालेगाव येथील बॉम्ब शोध पथक आणि रॉकी शान पथक यांच्यामार्फत स्थानक परिसरात घातपात विरोधी तपासणी करण्यात आली असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी दिली आहे.
                     याप्रसंगी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गव्हाणे, महिला पोलिस गायकवाड ,पोलीस नाईक अमोल खोडके, विजय जगनीत, रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक समाधान वाहुळकर, बॉम्ब शोध पथक अधिकारी व श्वान पथक अधिकारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA