भूमीपुत्र न्यूज नेटवर्क
नांदगाव : मारुती जगधने
व्ही.जे हायस्कुल,नांदगाव येथे जागतिक पहिल्या सौर उष्णतेवर आधारित वातानुकुलीत तंत्रज्ञानाचा शोध लावणारे शास्रज्ञ व सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊली यांचे वंशज डॉ.ओमप्रकाश कुलकर्णी यांनी शाळेला भेट देऊन शाळेच्या १९७७ च्या बॅच च्या माजी विद्यार्थांनी शाळेला दिलेल्या ऑंनग्रेड सोलरसिस्टीम चे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.सुरवातीला शाळेच्या प्रंगणात एन.सी.सी. व लेझीम पथकाच्या विद्यार्थांनी स्वागत करण्यात आले .त्यानंतर शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे व मुख्याध्यापिका जोत्स्ना आव्हाड यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.भैय्यासाहेब चव्हाण यांनी शाळेविषयी व शाळेतील विविध उपक्रमाची माहिती दिली. डॉ.ओमप्रकाश गणपतराव कुलकर्णी यांनी या भेटीत आपले मनोगतात त्याच्या जीवनातील आठवणी सांगितल्या नांदगाव ला माझा जन्म झाल आहे या गावात मला पुन्हा भेटण्याचा योग आला त्यामुळे मला आत्मिक आनंद झाला व त्याच बरोबर त्याच्या जीवनातील अनेक आठवणी सांगितल्या त्यात माजी राष्ट्रपती मा.डॉ.अब्दुल कलाम याच्याबरोबर केलेल्या कामाच्या आठवणी सांगितल्या .त्यांनी विविध देशात व राज्यात उर्जा विषयक सल्लगार म्हणून काम पहिले आहे.त्यांनी शाळेला भेट देऊन शाळेचे विविध उपक्रम व नाविन्याचा ध्यास घेणारी ह्या शाळेचे कौतुक केले व मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या संबधित ऑंनग्रेड सोलरसिस्टीम चे उद्घाटन माझ्या हस्ते शाळेने केले त्याबद्दल शाळेचे आभार मानले व अशा उपक्रमशील शाळेतील विद्यार्थांसाठी मी या शाळेत पुन्हा येऊन शाळेतील विद्यार्थांना मार्गदर्शन करील असे सांगितले . या प्रसंगी फेलोज विजय चोपडा, माजी विद्यार्थी सुनिल चांडक,दिलीप पारख,मुकुंद शहा , बाळासाहेब कवडे,कुणाल खरोटे,सचिन साळवे व इतर माजी विद्यार्थी तसेच शाळेचे उपमुख्याध्यापक मनोहर बडगुजर ,पर्यवेक्षक मनोहर शिंदे शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
Tags:
नांदगाव