BHUMIPUTRA

नांदगांव शहरातील भाजीपाला मार्केटरोडला पाण्याचे तळेNandgaon urbantil Bhajipala marketRodla Panyache Tale
भूमीपुत्र न्यूज नेटवर्क
नांदगांव : मारुती जगधने

नांदगांव शहरातील भाजीपाला मार्केटरोडला
पाण्याचे तळे तयार झाले की ?   भाजीपाल्याचे मळे? असे म्हटलेतर वावगे ठरु नहे ? शहरातील भोंगळे रोडवर भाजीपाला,मटन,मच्छी,फळे,बोंबिल  विक्रेत्यांनी जागे अभावी सर्वच दुकाने एकाच रस्त्यावर एका ठिकाणी मांडली आहेत  भोंगळे बाजार रोड  आता मल्टीपर्रपज   बाजार झाला कि  काय?  
नांदगांव च्या भोंगळे रोडवर आता दहेगांव नाक्या पासून लहानमोठे व्यवसाय थाटले आहेत भोंगळे रोडच्या एका बाजूला मच्छि बाजार व दुसर्या बाजूला भाजी बाजार भरत होता पण आता मटन मार्केट तोडल्याने, मटन विक्रेते देखील भोंगळे रोडवर दुकाने थाटुन मटन विक्री करतात त्यामुळे आता भोंगळे रोडवर, फळे,भाजीपाला,मच्छी,मटन, बोंबिल विक्रेते
 असी दुकाने थाटली आहे येथे भाजीपाला घ्या, बोंबिल घ्या ,मटन घ्या किंवा मच्छी घ्या,फळे घ्या  दुसरीकडे जाण्याची गरज नाही  हि झाली एक बाजू पण या भोंगळे रोडला काँक्रटवर मोठ मोठाले खड्डे पडले आहेत त्या खड्डयात पाणी साचले आहे या पाण्यातून वाट काढतांना आनेकजन सपकले तर दुसरी किळसवाणी गोष्ट म्हणजे ज्या भोंगळे रोडवर भाजीपाला,मटन,मच्छी,बोंबिल,फळे विक्रेते दुकाने थाटतात त्या दुकानातील मालावर रस्त्यावरुन जानार्या वाहनांचे टायरचे  घानपाणी उडते व तोच माल ग्राहक खरेदी करता हा प्रकार पावसाळ्यात सर्रास होतांना दिसतो आहे .तरी देखील रस्त्यावरील खड्डे बुजायला प्रशासन तयार नाही जवळपास सर्व भाजीपाला ,मटन,फळे,बोंबिल,मटन विक्रेत्यांच्या दुकाना समोरील खडडयात पाणी साचले आहे आणी तेच दुर्गधीयुक्त पाणी पाजीपाला अन्य मालावर उडतांना दिसते पालिका प्रशासन दैनंदिन कर वसूल करते पण व्यावसायिकांना पुरेशा सुविधा माञ मिळत नाही अशी खंत भाजिपाला व अन्य विक्रेते नाव न छापण्याच्या बोलीवर व्यक्त करतात नांदगांव च्या भोंगळे रोडचा वनवास कधी संपेल. 
यासह शहरात गांधी चौक,डाॅ आंबेडकर चौक, छञपती चौक आदी ठिकाणी देखील पाण्याचे तळे साचले आहे सध्या शहरात स्वच्छतेवर दुर्लक्ष झाले कि काय?  शहरात ठिक ठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने  डास मच्छर, चे प्रमाण वाढीस लागले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA