BHUMIPUTRA

श्री निलमणी गणेशच्या पार्थिव मूर्तीची पालखीतून विसर्जन महामिरवणुक संपन्नThe immersion procession of Lord Nilamani Ganesha's mortal idol from the palanquin was completed


भूमीपुत्र न्यूज नेटवर्क
मनमाड : नितिन पांडे

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द असणारा वेशीतील श्री निलमणी गणेश मंडळाच्या पार्थिव गणेश मुर्तीची विसर्जन महामिरवणुक पारंपारिक व धार्मिक संस्कृतीचे दर्शन घडवत सामाजिक उपक्रमांना देखील स्थान देत संपन्न झाली. "आम्ही परंपरा पाळतो, आम्ही संस्कृतीचे रक्षण करत " हे ब्रीदवाक्य घेवून श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे १९९७ पासून यंदा सलग २६ व्या वर्षी या महामिरवणुकीचे सकाळी आयोजन करण्यात आले होते. मनमाड पोलिस उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डी वाय एस पी) सौ श्री समीरसिंह साळवे यांच्या हस्ते मदिरात महाआरती होवून मिरवणुक शुभारंभाचा नारळ वाढविण्यात आला. यंदाच्या मिरवणुकीमध्ये मिरवणुक मार्गावर सुशोभित रांगोळी, महाराष्ट्राची लोकपरंपरा सांगणारे गोंधळी पथक मिरवणुकीची शिवकालीन दवंडी,वाद्यवृंद (बॅण्ड), सनई चौघडा, घोडे व उंटस्वार युवती, पारंपारिक वेशात श्री ढोल पथक मनमाड यांनी मिरवणुकीमध्ये ढोल वादनाची विविध प्रात्यक्षिके सादर केली आणि मानाच्या पालखी समोर चंद्र सूर्य, , (मानाची अब्दागिरी ) भगवा ध्वज,आणि सुगंधीत फुलांनी सजवलेली श्री निलमणीच्या पार्थिव मुर्तीची सुशोभित फुलानी सजवलेली पालखी, ही यंदाच्या मिरवणुकीची विशेष आकर्षणे ठरली. श्री निलमणीच्या पालखीजवळ शंखनादाने श्री गणेशाच्या जयजयकाराने परिसर दुमदुमला.  मिरवणुकीत मार्गावरील सर्वच राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना मंडळा तर्फे अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर मिरवणुकीत सर्व भाविकांना खडीसाखरेचा व मोदकाचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. या श्री निलमणीच्या पालखीतील पार्थिव मूर्ती ला मिरवणुक मार्गावर महिलांनी ठिकठिकाणी औक्षण केले. या श्री निलमणीच्या महामिरवणुकीचे संयोजन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टचे विश्‍वस्त अध्यक्ष किशोर गुजराथी, सचिव नितीन पांडे, विश्वस्त शेखर पांगुळ, गोविंद रसाळ, , प्रज्ञेश खांदाट कृष्णा शिंपी यांनी केले. तर या मिरवणुकीत श्री निलमणी गणेश मंडळाचे रामदास इप्पर, संदीप शिनकर, भरत छाबडा, माजी  शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद,, शिवाजी सानप, दीपक शिंदे, अक्षय सानप, अभिषेक पितृभक्त ,सौ व श्री डॉ मिलिंद धारवाडकर ,राहुल लांबोळे,रितीक चव्हाण, मच्छीद्र साळी,सौरभ मुनोत, मनोज छाबडा, प्रणव ललवाणी शाम शाकद्विपी, किशोर आव्हाड, पंकज जाधव,पवन सानप, योगेश म्हस्के,रोहित कुलकर्णी,अक्षय छाबडा, जागृती आहेर, अथर्व गुजराथी,दिक्षा पांगुळ, ऐश्‍वर्या जोशी, निकीता ढासे, प्रणव ललवाणी, राजेश  निकुंभ,संजय पठाडे, जव्हेरीलाल धांदल, उपेंद्र पाठक, महेश बोराडे,सचिन व्यवहारे ,सचिन वडक्ते आदी प्रमुखांसह श्री गणेश भक्त भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.या पारंपरिक मिरवणुकीस पहाणे साठी नागरिकांनी मिरवणूक मार्गावर दूतर्फा मोठी गर्दी केली होती मनमाड शहर पोलीस स्टेशनचे  प्रभारी पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनात या मिरवणुकीसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्टतर्फे मिरवणुकीचे संयोजन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA