भूमीपुत्र न्यूज नेटवर्क
नांदगाव : मारुती जगधने
नांदगांव शहरात आनेकांनी प्रजन्यवृष्टीचा आनंद घेत गणेशाचे विसर्जन केले पडणार्या पावसाचे पाणी भांड्यात धरुन त्यात गणेशाचे विसर्जन केले.
गणेशोत्सव हा पर्यावरण पूरक व्हावा गणेशोत्सवाचा आनंद घेता यासाठी कला शिक्षक विजय चव्हाण यांच्या कल्पनेतून गेल्या आठ वर्षापासून सातत्याने नरेंद्र नगर मध्ये पर्यावरण पूरक विसर्जन हि संकल्पना राबवीत आहेत . गणेशोत्सव हा पर्यावरण पूरक साजरा करावा व विसर्जनातुन जल प्रदूषण होऊ नये म्हणून हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो .या वर्षी हि कॉलनीतच बहुसंख्ये नागरिक मातीचे स्वताच्या हाताने गणपती तयार करून त्याची स्थापना केली होती . गणेश भक्तांना निसर्गात गणपती विसर्जन करण्याचा आनंद मिळावा यासाठी विजय चव्हाण यांनी यासाठी घरासमोर निसर्गातील धबधबा याचा देखावा तयार करण्यात आले व समोर पाण्याचे तळे करून त्यात गणपती विसर्जन केले.प्रथम सर्व नागरिक एकाच वेळी देखाव्या समोर येऊन भक्तिभावाने सहपत्नी आरती करण्यात आली त्यानंतर मोठ्या भक्ती भावाने गणपतीचे विसर्जन करण्यात आले . तसेच निर्माल्य तेथील झाडानभोवती खड्डा करून त्यात टाकण्यात आले.व शेवटी जमा झालेला सर्व गणेश भक्तांना प्रसादाचे वाटप केले.या विसर्जन प्रसंगी नरेंद्र नगरातील विजय चव्हाण, मनोहर हिरे, बापू सुरसे , सामाजिक कार्यकर्ते संजय मोकळ ,सुनिल आढाव ,किरण परदेशी ,धनराज अग्रवाल, ,गुलाब पाटील ,भास्कर मधे ,निखील जगताप अनिल जाधव , बालगोपाळ,व महिला उपस्थित होते.
दरम्यान दुपारी २;३० वा धुव्वाधार पावसाने तालुका झोडपुन काढत सर्वञ पाणीच पाणी झाले आनेकांनी गणेश विसर्जनात पावसात नाचून बागडुन गणेशाचे विसर्जन केले नांदगांव शहरात लहान मोठ्या गणेश मंडळाचे विसर्जनाच्या मिरवनुका सुरु होत्या पावसामुळे त्यांना व्यत्यय आला परंतु काही मंडळानी पावसातच गणेश विसर्जन करून बाप्पाला निरोप दिला. घरगुती गणेशचे विसर्जन पावसाचे पाणी भांड्यात ,टपात धरुन बाप्पाचे विसर्जन केले.
Tags:
नांदगाव