BHUMIPUTRA

प्रा.नितीन लालसरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 'जनसंपर्क अधिकारी' म्हणुन नियुक्तीAppointment of Prof. Nitin Lalsare as 'Public Relations Officer' by Chief Minister Eknath Shindeभूमीपुत्र न्यूज नेटवर्क
मनमाड : विशेष प्रतिनिधी

मनमाड शहराचे भुमीपुत्र आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन समाजात ओळख असणारे प्रा.नितीन लालसरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 'जनसंपर्क अधिकारी' म्हणुन पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे.

    गेल्या आठ ते दहा वर्षांपासुन प्रा.लालसरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत यांचे अत्यंत विश्वासु अधिकारी म्हणुन काम करत आहे. गेल्या सरकारमध्ये देखील प्रा.लालसरे यांच्याकडे नामदार श्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणुन जबाबदारी होती .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासु आणि जबाबदार अधिकाऱ्यांपैकी प्रा.नितीन लालसरे हे एक असुन , काही महिन्यांपूर्वी मनमाड येथे संपन्न झालेल्या प्रा.लालसरे यांच्या विवाह सोहळ्याप्रसंगी देखील नामदार एकनाथ शिंदे आवर्जुन उपस्थित होते.

    आयुष्यातील आलेल्या अनेक अडचणींवर मात करून , कठोर परिश्रम , उच्चशिक्षण घेऊन आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सर्वसामान्य कुटुंबातुन मोठे झालेले  प्रा.नितीन लालसरे यांची राज्याचे मुख्यमंत्री यांचे 'जनसंपर्क अधिकारी' या अत्यंत महत्वाच्या पदावर झालेली नियुक्ती ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. या पदाला नक्कीच न्याय देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने समाजातील गरजवंत नागरिकांची सेवा करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया प्रा. नितिन लालसरे यांनी दिली.

   मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी या महत्वाचा पदावर झालेल्या नियुक्ती बद्दल समाजातील सर्व स्थरातुन प्रा.नितिन लालसरे यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA