BHUMIPUTRA

सब वे बनला वाहतुकीतला ‘कबाब मे हड्डी’ Subway has become the 'Kebab Me Huddi' of transport.

भूमीपुत्र न्यूज नेटवर्क
नांदगाव : सुमितकुमार जगधने 

नांदगाव येथील सब वे नागरिक आणि वाहने यांच्या वाहतुकीतला  ‘कबाब मे हड्डी’ बनला आहे. केवळ गेट बंद करावयाचे म्हणून घिसाडघाईने तयार केलेला आराखडा सुरवातीपासून वादात सापडला. सब वे च्या वाहतूक क्षमतेविषयी वेळोवेळी नांदगावकरांनी आवाज उठवला. भविष्यातली वाहतूक व तिची वाढ लक्षात न घेता रेल्वे प्रशासनाने तो शहरवासीयांवर थोपवला. पावसाळा असो की इतर ऋतू कायमच तो वाहतुकीच्या घशातला शुक्राचार्य ठरला आहे.दि २५ रोजी दिवसातून पाचवेळा सबवेची वाहतुन ठप्प झाली अशावेळेला मोठी समस्या निर्माण होती येथे वाहतूक पोलिसाची गरज आहे .

रेल्वेच्या अभियांत्रिकीचे हे मोठे अपयश म्हणावे की, आले त्यांच्या मना....तिथे कोणाचे काही चालेना असे झाले आहे. सब वे हि ऑल सिझन कायमस्वरूपी डोकेदुखी झाली आहे. सब वे झाला त्याच वर्षी सब वे पुराच्या पाण्यात बुडाला. सब वे तून घुसलेले पाणी रस्त्यावर आले आणि रस्त्यालगतच्या इमारतीतले पहिले मजले घरे, दुकाने पाण्यात बुडाले. कोटींचे नुकसान झाले. त्यानंतर सब वेच्या आराखड्यावर आक्षेप  घेण्यात आले. तेव्हा रेल्वे अभियंते यांनी मटन मार्केट तोडले तर मार्ग काढू असे सांगितले. लोकांच्या विरोधात नगरपरिषदेने स्वत: बांधलेल्या मार्केटवर हातोडा चालवून ते तोडले.

गुरुवारी पाऊस नव्हता तरी कोंडी झाली. अशी कोंडी तर दररोज अनेकदा होते. सब वे वाहनांच्या कर्णकर्कश्श आवाजाने निनादत असतो. कोंडी झालेली वाहने क्यांव क्यांव करत आपला मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतानाचे दृश्य खूप त्रास देणारे असते. हे बघायला रेल्वेचे अधिकारी व लोकप्रतिनिधी कोणीच नसतात. पण मुकी बिचारी कुणी हि हाका या न्यायाखाली दडपली गेल्याने आपली वाट शोधतांना धडपडत असतात. दररोज सरासरी एखादा तरी धडपडतो.... अत्यंत कडवट प्रतिक्रिया देत पुढे सरकतो. एकीकडे केंद्र सरकार भविष्यातली आवाहने डोळ्यासमोर ठेवून प्रकल्पांची आखणी करत असतांना रेल्वेच्या ‘गेट बंद प्रकल्पा’ ने मात्र शहरातून जाणाऱ्या  वाहतुकीचे भविष्य अंधारमय केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA