BHUMIPUTRA

झलक दिखला जा... एक बार आ... जा... आ... जा... आ..जा …


भूमिपुत्र न्यूज नेटवर्क
नांदगांव : सुमितकुमार जगधने 

नांदगांव तालुक्यात बैलपोळा उत्सहात साजरा होत असतांना 
आल अंगावर तर घेतल शिंगावर याची प्रचिती जामदरी येथे पोळ्याच्या दिवशी बैलाने एकाला शिंगावर घेतल्याने आली. जामदरी गावा नजीक एका  तांड्यावर पोळ्याच्या मिरवणुकीत हि घटना घडली. त्यावेळी झलक दिखला जा... झलक दिखला जा... एक बार आ... जा... आ... जा... आ..जा  या गाण्याच्या तालावर बैलासमोर नाचत आव्हान देणाऱ्या ‘त्या’ ला बैलाने एक बार शिंगावर घेत शिन्गातली झलक दाखवली.
यंदा पाऊस चांगला झाला असल्याने शेतात पिके जोमाने उभी आहेत. डोंगरावर व मैदानांवर कोवळ्या हिरव्या गवताची भरमार असून मनसोक्त चरायला मिळाल्याने....
दिवस सुगीचे सुरु जाहले 
ओला चारा बैल माजले
शेतकरी मन प्रसन्न जाहले
या कवी श्रीधर रानडे यांच्या कवितेसारखी स्थिती ग्रामीण भागात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात यंदा पोळ्याच्या दिवशी उत्साहाला उधाण आले होते. ढोल ताशांच्या गजरात नखशिखांत सजवलेल्या बैलांच्या मिरवणुका निघाल्याने वातावरण ढवळून निघाले होते.  
नांदगांव तालुक्यातील जामदरी तांड्यावर सजवलेल्या बैलांची मिरवणूक सुरु होती. तेव्हा नृत्याविष्कार दाखवत एक तरुण बैलाच्या समोर येऊन वेडेवाकडे अंगविक्षेप करून नृत्य करण्याचा प्रयत्न करत असतांना त्याने बैलाच्या वेसणीला हात घालून त्याला डिवचले. त्याची ही कृती बैलाला आवडली नाही कि काय......पण त्या खिलारी बैलाने आक्रमक होत तत्क्षणी तरुणाला शिंगावर घेऊन खाली आपटले. बैलाच्या या अचानक हल्यामुळे गोरोमोरा झालेल्या तरुणाने मिरवणुकीतून काढता पाय घेतला. मात्र या घटनेची आला आला अंगावर तर घेतला शिंगावर....असे टायटल असणारी व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे.      

प्रांण्याना देखील राग येतो.......त्यात शिंग असलेल्या प्राण्याच्या नादी कोणी लागू नये नाहीतर शिंगावर घेतले जाते. हा संदेश जणू या घटनेतून मिळाला आहे.

फोटो  पोळ्याच्या मिरवणुकीत नाचणाऱ्या तरुणाला शिंगावर घेत अशी झलक बैलाने दाखवली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA