BHUMIPUTRA

पैसे देऊन पोटच्या मुलाची आईने केली हत्याThe mother killed her unborn child by paying money




भूमीपुत्र न्यूज नेटवर्क

नांदगाव : विशेष प्रतिनिधी

मनोरुग्ण असलेल्या मुलाचा त्रास असह्य झाल्याने आईनेच पोटच्या मुलाची पंधरा हजार रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा प्रकार नांदगाव तालुक्यातील ढेकू येथे घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , हत्या झालेल्या जनार्दन अप्पा पेंढारे याची आई जन्याबाई पेंढारे यांनी मुलाची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे . हत्येची सुपारी घेणारा संशयित आरोपी समाधान दौलत भड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . याबाबत जन्याबाई यांनी पोलिसांत दिलेल्या जबाबानुसार मुलाला फिट येत असल्याने व मुलगा मनोरुग्ण असल्याने गावात राहणाऱ्या समाधान भड याला मुलाला मारण्यासाठी पंधरा हजार रुपये दिले . ठरल्याप्रमाणे भड याने गुरुवारी दुपारी मुलगा जनार्दन याच्या डोक्यात पहारीने घाव घालत ठार मारले . व मृतदेह प्लास्टिकच्या कागदात गुंडाळून साईनाथ राठोड यांच्या शेतात फेकून दिला . घटनेची माहिती समजल्यावर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी , पोलीस उपविभागीय अधिकारी समिरसिंग साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली . घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे , सहायक पोलिस निरीक्षक दीपक सुरवडकर , पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे , पोलीस नाईक अनिल गांगुर्डे , सागर कुमावत , भारत कांदळकर करत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA