BHUMIPUTRA

अडीच वर्षे बंद असलेली जनरल तिकीट सेवा सुरू ; पहिल्याच दिवशी सात लाखाचे उत्पन्नGeneral ticket service resumed after two and a half years; Income of seven lakhs on the first day itself




भुमीपुत्र न्यूज नेटवर्क
मनमाड : विशेष प्रतिनिधी

तब्बल अडीच वर्षानंतर रेल्वेची जनरल तिकिट सेवा बुधवारपासून सुरू झाली . आणि पहिल्याच दिवशी जनरल तिकिटाच्या विक्रीतून मनमाड रेल्वे स्थानकाला ७ लाख ६३,८१५ इतका महसूल प्राप्त झाला . आता दिवसा गणिक रेल्वेच्या उत्पादनात जास्त महसूल , मिळणार आहे . रेल्वेची सर्वसाधारण तिकिट विक्री सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला . मध्यरात्रीपासून अडीच वर्षापासून बंद असलेले सर्वसाधारण तिकिट काऊंटर खुले झाले . आणि या तिकिटासाठी पहिल्या दिवशी प्रवाशांच्या रांगा दिसून आल्या दिवसभरातील २४ तासात ' विविध राज्यात परराज्यात जाणाऱ्या ३७४१ प्रवाशांनी ३०७८ तिकिटे खरेदी केली . त्याद्वारे रेल्वेला पहिल्याच दिवशी ७ लाख ६३ हजार रूपये इतके उत्पन्न मिळाले . आज सलग दुसऱ्या दिवशी गुरूवारी सर्वसाधारण खिडकी समोर प्रवाशांच्या रांगा दिसून आल्या . 

उत्तर महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आणि मध्य रेल्वेचे प्रमुख जंक्शन स्टेशन असलेल्या मनमाड रेल्वे स्थानकांत बुधवारपासून रेल्वेचे जनरल तिकीट सुरू झाल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला . आता कधीही ऐनवेळी तिकीट काढून रेल्वे प्रवास करणे सुलभ होणार असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले . आज पहिल्याच दिवशी रेल्वेच्या तिकीट विक्री खिडकीवर बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला . यम कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली रेल्वेची जनरल तिकीट सेवा तब्बल अडीच वर्षानंतर बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झाली . इतके दिवस बंद असलेल्या तिकीटाच्या खिडक्या आज खुल्या झाल्या त्यामुळे जनरल तिकीट घेवून कधीही मेल आणि एक्सप्रेस रेल्वेमधून प्रवाशांना आता प्रवास करता येणार आहे . मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकांतून दररोज २४ तासात १२० वर मेल एक्सप्रेस धावतात . तर १२ हजार प्रवाशांचे आवागमन होते . या सर्वच प्रवाशांना जनरल तिकीट सेवेचा लाभ होणार आहे . शिवाय रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे . यापूर्वी फक्त ठराविक रेल्वेचे जनरल तिकीट आरक्षणाशिवाय मिळत होते .

आता जनरल तिकीटाबरोबरच एटीव्हीएम , अनारक्षित तिकीट काऊंटर , जीटीबीएस , युटीएस आणि मोबाईल अॅपद्वारेही जनरल तिकीट सुविधा दिली जाणार आहे . त्यामुळे आता वेटिंग लिस्ट असलेल्या आणि ऐनवेळी नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा मिळणार असून रेल्वे प्रवास आता सोपा होणार आहे . विशेष म्हणजे सर्व मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचे जनरल तिकीट मिळणार आहे . म्हणजेच तुम्ही आरक्षणाशिवाय ऐनवेळी तिकीट काढून रेल्वे प्रवास करू शकणार आहात . कोरोना काळात खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने रेल्वे गाड्यांमधील गर्दी टाळण्यासाठी २२ मार्च २०२० पासून रेल्वेचे जनरल तिकीट बंद केले होते .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA