भूमीपुत्र न्यूज नेटवर्क
नांदगाव : प्रतिनिधी
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नाने नांदगाव मतदार संघातील आरोग्य विभागासाठी फोर्स कंपनीच्या चार अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहे.
नांदगांव मतदार संघातील सर्व सामान्य नागरिकांना तात्काळ रुग्णसेवा देता यावी आणि वेळेत उपचार उपलब्ध व्हावेत या एका उद्देशाने आमदार सुहास आण्णा कांदे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून नांदगांव मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सुसज्ज व सर्व सुविधायुक्त चार रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. या चारही रुग्णवाहिका आज सोमवार सायंकाळी या नांदगाव शहरात दाखल झाल्या. या रुग्णवाहिकांचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या निवासस्थानी नारळ वाहून व पुजा करून स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष राजश कवडे, माजी सभापती विलास आहेर, शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे व आनंद कासलीवाल यांनी रुग्णवाहिकेस नारळ वाहून पूजा केली.
नांदगांव मतदार संघासाठी यापूर्वी एकावेळी एक पेक्षा जास्त रुग्णवाहिका कधीही उपलब्ध झाल्या नव्हत्या. परंतु आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नामुळे मतदार संघासाठी एकाच वेळी नविन चार रुग्णवाहिका उपलब्ध होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या चार रुग्णवाहीकांपैकी तीन रुग्णवाहिका या नांदगांव तालुक्यातील हिसवळ खुर्द, वेहेळगांव व पिंपरखेड या प्राथमिक आरोग्य केंद्राना तर एक रुग्णवाहिका मालेगांव तालुक्यातील निमगांव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. व उर्वरित सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना देखील लवकरच रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जातील असेही सांगितले. सुसज्ज व सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने मतदार संघातील जनतेला सेवा पुरविण्यासाठी अजून जोमाने काम करता येणार आहे. या व्यतिरिक्त काही अडचनी असल्यास आपण निश्चित मला कळवावे असे मत आमदारांनी व्यक्त केले. तालुक्यातील रुग्णांना आपण योग्य वागणूक आणि योग्य उपचार द्याल अशी अपेक्षा करतो असेही यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितले.
या वेळी प्रमोद भाबड, प्रशांत पगार, एन. के. राठोड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जानकर वेहेळगाव, डॉक्टर नीलम वैद्य पिंपरखेड, डॉक्टर माधुरी शिंदे निमगाव, डॉक्टर विनया बोरसे हिसवळ, रुग्णवाहिका चालक हेमंत आहेर हिसवळ, शांतीलाल राठोड वेहेळगाव, अमोल गरुड पिंपरखेड, संदीप पारखे निमगाव, लिपिक करण राठोड, जयेश देशमुख, उमेश आहेर, जाफर शेख, प्रकाश चव्हाण आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags:
नांदगाव