BHUMIPUTRA

चेअरमनपदी बाजारसमितीचे सभापती तेज प्रकाश कवडे तर व्हा.चेअरमनदी अभिमान कवडे यांची बिनविरोध निवडUnopposed election of Tej Prakash Kawade as Chairman of the Market Committee and Abhiman Kawade as Chairman.भूमिपुत्र न्यूज नेटवर्क

नांदगाव : प्रतिनिधी
 नांदगांव तालुक्यातील बाणगांव बुद्रुक विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी  बाजारसमितीचे सभापती तेज प्रकाश कवडे तर व्हा.चेअरमनदी अभिमान कवडे यांची बिनविरोध निवड झाली.
 बाणगाव येथील श्री बाणेंश्वर मंदिराच्या परिसरात  निवडणूक निर्णय अधिकरी तथा सहायक सहकार अधिकारी लक्ष्मण गमे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या  अध्यक्ष पदासाठी विहित मुदतीत तेज प्रकाश कवडे तर उपाध्यक्ष पदासाठी अभिमान सिताराम कवडे यांचा प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण गमे यांनी दोन्ही पदासाठी निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाल्याचे घोषित केले अध्यक्ष पदासाठी तेज कवडे यांना सूचक म्हणून संदीप कवडे तर अनुमोदक म्हणून वसंत कवडे यांनी स्वाक्षरी केली उपाध्यक्ष पदासाठी अभिमान कवडे यांना सूचक म्हणून शांताराम काका कवडे तर अनुमोदक म्हणून जयराम जाधव यांनी स्वाक्षरी केली. 
    बाणगांव बुद्रुक विविध कार्य सेवा सोसायटी ची स्थापना १९२६ साली झाली सुरवातीला टाकळी, भौरी, बाणगांव अशी गावे मिळून सोसायटी चे कार्यक्षेत्र होते आता बाणगांव बुद्रुक सोसायटी चे कार्य क्षेत्र स्वतंत्र झाले आहे या सोसायटीने आर्थिक परीस्थितीत प्रगती केली आहे स्थापने पासून ते आज पर्यंत कर्ज वसूली १००℅आहे  गेली ५० वर्षा पासून  बापुसाहेब कवडे संस्थेचे अध्यक्ष होते .यावेळीही बांणगाव बुद्रुक सोसायटी चा इतिहास नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा अधोरेखीत झाला संस्थेची पंचवार्षिक निवडणूक अपेक्षे प्रमाणे बिनविरोध झाली होती व चेअरमन व व्हा.चेअरमनपदाची निवडणूक बिनविरोध झाली .
 यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा गावच्या वतीने सत्कार करण्यात आले यावेळी जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे, एकनाथ सदगीर, रमेश गोराडे, वसंत कवडे, संदीप कवडे यांनी मनोगत व्यक्त केले निवडनुक निर्णय अधिकारी म्हणून लक्ष्मण गमे  सहायक सहकार अधिकारी व सचिव सजंय फणसे यांनी काम पाहिले या निवड प्रसंगी संचालक शांताराम काका  कवडे ,प्रभाकर कवडे,मच्छिद्र कवडे, वसंत कवडे, अशोक कवडे,संदीप कवडे, भावराव देवकर, जयराम जाधव भगवान कोळेकर राजुबाई कवडे, मैनाबाई आहेर,  यावेळी जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे पंचायत समितीचे माजी सभापती भाऊसाहेब हिरे नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती एकनाथ सदगीर, कैलास पाटील, उपसरपंच नारायण कवडे,सुनिल कवडे, सोसायटीचे माजी उपाध्यक्ष शांताराम पाटील माजी सरपंच मोहनराव कवडे, भाऊसाहेब कवडे, चांगदेव देवकर, माणिकराव आहेर, कैलास गायकवाड, विलास गायकवाड, विक्रम फोडसे सचिव बाळासाहेब पवार, सुधाकर कवडे, अतुल कवडे, रवींद्र देवकर, किशोर आहेर, प्रमोद घोडके,आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA