भूमीपुत्र न्यूज नेटवर्क
नांदगाव : प्रतिनिधी
कांदा या शेती पिकाला कवडीमोल दर मिळत असल्यामुळे प्रहार शेतकरी संघटनेचे नांदगाव बाजार समिती समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले
मार्च व एप्रिल दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दर पडल्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या गोष्टी कडे केंद्र व राज्य सरकारचे कुठल्याही प्रकारचे लक्ष नसून त्यामुळे भविष्यात आर्थिक अडचणीमुळे शेतकरी आत्महत्या करू शकतात.यास सर्वस्वी केंद्र व राज्य शासन जबाबदार असेल. शासनाने मार्च व एप्रिल दरम्यान अत्यल्प दरात विक्री होत असलेल्या कांद्याला प्रति क्विंटल १००० रुपये प्रमाणे तात्काळ अनुदान देण्यात यावे. केंद्र शासनाने नाफेड मार्फत कांदा खरेदी तात्काळ चालू करावी, MREGS (नरेगा) ह्या योजनेत कांदा पिक हे समाविष्ठ करून कांदा लागवड ते काढणी पर्यंतचा होणारा मजुरीचा खर्च देण्यात यावा. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात घट होवून शेतकऱ्यास अतिरिक्त लाभ मिळेल. आज रोजी जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडत असतांनी शेतकरी उत्पादन करत असलेल्या प्रत्येक मालाला कवडीमोल भावाने खरेदी केले जात आहे. तरी कांद्याचे पडलेले बाजारभाव सुधारण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात. ह्या सगळ्या विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात आज दि. ११ मार्च २०२२ सोमवार रोजी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे.सदर आंदोलनानंतरही केंद्र व राज्य शासनाने सदर मागण्या मान्य न केल्यास यापुढे होणारे आंदोलन हे तहसील कार्यालयासमोर अधिक तीव्रतेने केले जाईल. याची आपण दाखल घेवून सदर मागण्यांची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा .
यावेळी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलकांनी कांद्याच्या माळा गळयात रस्ता रोको आंदोलन केले. महसुल प्रशासना कडून मंडळ अधिकारी गोविंद काळे तलाठी मासुळे यांनी निवेदनाचा स्विकार केला यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पो. ना. शेरेकर ' दिपक मुडें ' सोनवणे आदीनी चोख बंदोबस्त ठेवला . प्रहार शेतकरी संघटनेचे मालेगाव तालुका अध्यक्ष शेखर पगार नांदगावचे अध्यक्ष संदीप सुर्यवंशी ' जर्नाधन पगार ' तसेच कांदा उत्पादक संघटनेचे सोमनाथ मगर यांच्यासह शेकडो कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते .
Tags:
नांदगाव