भूमीपुत्र न्यूज नेटवर्क
मनमाड : प्रतिनिधी
येथील संत बार्णबा देवालयात येथे आज (दि.17) रोजी इस्टर संडे येशूच्या पनरूत्थाचे स्मरण करण्याकरता हा सण साजरा केला जातो. 2000 वर्षांपूर्वी येशू ख्रिस्ताचा मृत्यू झाला होता. तिसर्या दिवशी परमेश्वराने भाकित केल्याप्रमाणे त्याच्या पुत्राला येशूला पुन्हा जीवंत केले.येशु ख्रिस्ताच्या पुरूत्थानाची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो.
शुक्रवार दि.15 एप्रिल रोजी ‘उत्तम शुक्रवार‘ गुड फ्रायडे या दिवशी येशू ख्रिस्ताचा यातनामय मृत्यूचे स्मरण म्हणून साजरा केला गेला आणि आज पुनरूत्थान दिन (इस्टर संडे) निमित्त देवालयात सकाळी सुर्योदयापूर्वी भक्ती कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.यावेळी महिला मंडळा तर्फे ख्रिस्त उठला आहे, खरोखर उठल आहे. हालेलुय्याह ! या विषयावर उपदेश देण्यात आला व भक्ती प्रार्थना करण्यात आली. यानंतर पवित्र सहभागिता व भक्ती व संदेश आयोजित करण्यात आला होता.चर्चचे प्रेसबिटर इन चार्ज रेव्ह.फिलीप वरा यांनी मृत्युंजय येशू ख्रिस्त या विषयावर भक्तीसंदेश दिला. यावेळी उपासनेसाठी संत बार्णबा देवालयात ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांयकाळी सर्व पंथीय ख्रिश्चन समाजबांधवांतर्फे सर्व धर्मात शांतता, प्रेमाचा, क्षमेचा, दयेचा आणि मानवतेचा संदेश इस्टर फेरीच्या माध्यामातून दिला जातो. या मागील दुसरा उद्देश म्हणजे, सर्व पंथीय ख्रिस्तीबांधवांनी एकत्र यावे, समाजातील दुःखी, गरीब, गरजु लोकांना मतद व्हावी, त्यांच्या सुख, दुःखात सामील व्हावे हा आहे.
दरम्यान सायंकाळी संत बार्ण बा चर्च येथून शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी चौक तसेच शहरातील विविध भागात रॅली काढून एकात्मता चौक इथे समाप्त झाली. या वेळी " प्रभू उठला आहे...खरोखर उठला आहे " अशी घोषणा देत भक्तिमय वातावरणात ही रॅली संपन्न झाली. शहरातील एकात्मता चौकात फुले - शाहू - आंबेडकर विचार मंचातर्फे फिरोज शेख, कादिर शेख, शकुर शेख आदि पदाधिकाऱ्यांनी धर्मगुरू फिलीप वरा यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित ख्रिस्ती बांधवांना पाणी वाटप करण्यात आले.
Tags:
मनमाड