भुमीपुत्र न्यूज नेटवर्क
नांदगाव : प्रतिनिधी
नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील शेकडो युवकांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युवा सेनेत प्रवेश केला आहे.
नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात तरुणांची लक्षणीय संख्या आहे, साकोरा तील तरुण हा सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यांमध्ये नेहमीच दिसून येत असतो, शक्यतोवर येथील तरुणांना राजकीय पक्षांचा जास्त मोह नसतो, हे सर्व तरुण आपल्या वैयक्तिक जोरावर सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि खेळ यामध्ये काम करताना दिसून येतात पण सध्याचे विद्यमान आमदार सुहास आण्णा कांदे हे सामान्य नागरिकांना तसे सहजपणे उपलब्ध होत असतात कोणत्याही व्यक्तीशी फोनवर बोलण्यासाठी तयार असतात प्रत्यक्ष भेटण्यासाठी PA गरज पडत नाही धडाडीचे निर्णय घेण्यास आमदार मागे पुढे पाहत नाही आणि या सर्व गुणांमुळे साकोरा गावातील तरुणांची मोठी फळी आमदार सुहास आण्णा कांदे यांची फॅन झाली आहे. अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याशी संपर्क आल्यानंतर अगदी आपल्या टीम मेंबर किंवा मित्रासारखे आमदार सुहास अण्णा कांदे हे हसून खेळून बोलतात या स्वभाव आकडे आकर्षित होत या सर्व तरुण वर्गाने आज शिवसेना पक्षात कार्य करण्याची इच्छा दाखवत शिवबंधन बांधले.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी या सर्व तरुणांचे तोंड भरून कौतुक केले आणि पक्षामध्ये स्वागत केले भविष्यात आपणास कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास पहिला फोन मला करा असे आश्वासने दिले, मला आमदार नाहीतर तुमच्या मित्रासारखा किंवा तुमच्या मोठ्या भावासारखा समजा, समाजा मध्ये काम करत असताना समाज आपला आदर्श घेईल असे काम करा आपल्या पक्षाचे आणि आपले स्वतःचे नाव मोठे करा तुम्हाला कुठेही अडचण आली तर मला सांगा असे सांगत उपस्थित तरुणांचा उत्साह त्यांनी वाढवला.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे माजी सभापती विलास आहेर गुलाब भाबड अमोल नावंदर युवा सेना तालुका प्रमुख सागर हिरे भैय्यासाहेब पगार साकोरा गट प्रतिनिधी सुरज बोरसे उपस्थित होते.
Tags:
नांदगाव