BHUMIPUTRA

नांदगाव शहरात रामनवमी निमीत्त भव्य शोभायात्राGrand procession on the occasion of Ram Navami in Nandgaon city


भुमीपुत्र न्यूज नेटवर्क

नांदगाव : प्रतिनिधी

शहरात रामनवमी निमीत्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेला न भुतो न भविष्यती अशी गर्दी होती शहरातील महावीर लेन जवळ असलेल्या राममंदीरा पासून शनिमंदीर चौकातून निघालेल्या या शोभायात्रेत हजारोच्यां संख्येने रामभक्त सामील झाले होते. यात्रेच्या सुरवातीस व्ही. जे. हायस्कुलचे एन. सी . सी पथक त्यांनतर शेकडो च्या संख्येने महीला या शोभायात्रेचे मुख्य आर्कषण होते . ढोलपथक ' बँजो पथक यावर नाचणारे हजारो रामभक्त हे शोभायात्रेचे विशेष आर्कषण होते .
  सजविलेल्या ट्रॅक्टर वर प्रभु श्रीरामा ची भव्य मुर्ती शोभायात्रेची आर्कषण ठरली . शोभायात्रेच्या मार्गात नांदगावकरानीं सरबत ' मठ्ठा ' थंड पाणी याचे मोठया प्रमाणावर वाटपाची सोय केली होती. 
  नांदगाव शहराच्या इतीहासात  या शोभा यात्रेला  शहरातील हिदूं प्रेमी रामभक्त  नागरीक हजारोंच्या संख्येने सामील झाले होते.
   शोभायात्रेच्या मार्गात विज वितरण कंपनी सुचना देवूनही बऱ्याच ठीकाणचे स्ट्रीट लाईट बंद होते याचा नागरिकांनी निषेध केला . सदर शोभायात्रेत नांदगावचे पो. नि. रामेश्वर गाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA