भुमीपुत्र न्यूज नेटवर्क
नांदगाव : प्रतिनिधी
मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस व मनमाड छत्रपती शिवाजी टर्मिनस पंचवटी एक्सप्रेस या दोन्ही गाड्या नांदगाव वरून सोडाव्या यासाठी केद्रीय मंत्री श्रीमती.भारतीताई पवार यांना शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेकडून निवेदन देण्यात आले .
याबाबत वृत असे की रामनवमीच्या शोभायात्रे साठी केद्रींय मंत्री पवार या नांदगावी आल्या असता शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेने निवेदन दिले की, मनमाड कुर्ला टर्मिनन्स गोदावरी एक्सप्रेस वे मनमाड़ छत्रपती शिवजी टर्मिनल पंचवटी एक्सप्रेस या दोन्ही प्रवाशी रेल्वे गाड्या मनमाड रेल्वे स्टेशन वरुण सुटतात. मात्र नांदगांव शहर व तालुक्यातील ग्रामीण भगातुन व्यवसाय, नोकरी, शिक्षण व दैनंदिन कामासाठी शेकडो प्रवासी नाशिक, इगतपुरी व मुँबई येथे ये जा करत असतात. परंतु नांदगांव येथून कार्यालयीन व शालेय वेळेशी सलग्न अशी एकही प्रवाशी रेल्वे गाड़ी नसल्यामुळे प्रवाशाची गैरसोय होत असते. त्यामुळे नांदगांव रेल्वे स्टेशन वरुण या वेळेत प्रवाशी रेल्वे गाड़ी सुरु करण्यात यावी अशी प्रवाशांची तसेच नागरिकांची अनेक दिवसांची सातत्यांची मागणी आहे.
तरी नांदगांव शहर व तालुक्यातील प्रवाशांची गैरसोय दूर होण्यासाठी १) मनमाड कुर्ला टर्मिनल गोदावरी एक्सप्रेस व २) मनमाड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पंचवटी एक्सप्रेस अप १२११० व डाउन १२१०९ या दोन्ही प्रवाशी रेल्वे गाड्यापैकी एक प्रवाशी रेल्वे गाड़ी नांदगांव रेल्वे स्टेशन वरुण सुरु करण्यात यावी अशी ही विनंती.
यावेळी करण्यात आली ' यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुमीत गुप्ता यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते .
Tags:
नांदगाव