BHUMIPUTRA

यशवंत पतसंस्था पेठ चेअरमनपदी भास्कर गावित तर उपचेअरमनपदी मनोहर भोये यांची बिनविरोध निवड Bhaskar Gavit elected as Chairman of Yashwant Patsanstha Peth and Manohar Bhoye elected unopposed as Deputy Chairmanभूमिपुत्र न्यूज नेटवर्क

  पेठ : प्रतिनिधी

पेठ शहरातील व्यापारी वर्गाची आर्थिक वाहिनी समजल्या जाणाऱ्या यशवंत बिगर शेती सहकारी पतसंस्था पेठचे चेअरमनपदी भास्कर गावित तर उपसरपंचपदी मनोहर भोये यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  खेळीमेळीच्या वातावरणात निवड प्रक्रिया पार पडली . चेअरमन पदासाठी भास्कर गावित व उपचेअरमन पदासाठी मनोहर भोये यांचे अर्ज असल्याने सहकार अधिकारी राजीव इप्पर यांनी चेअरमन पदी भास्कर गावित व उपचेअरमनपदी  मनोहर  भोये यांना बिनविरोध घोषित केले.                                                     यावेळी संचालक सुरेंद्र गाडगीळ, उत्तम महाले, मंगेश राहणे ,गणेश शिरसाठ ,कामिनी डोमे, कल्पना संगमनेरकर, रामदास शिरसाठ, कांतीलाल राऊत ,राजू शिंदे, हिरामण गावित , शैलेश करवंदे, आकाश करवंदे, कैलास बोढाई आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA