BHUMIPUTRA

सेवानिवृत्त झालेल्या सैनिकाचे केले जंगी स्वागतA warm welcome to the retired soldierभुमीपुत्र न्यूज नेटवर्क
मनमाड : प्रतिनिधी


मनमाड रेल्वे स्थानक नेहमीच कोणत्या ना कोणत्या माध्यमातून चर्चेत राहते मात्र आज मनमाड रेल्वे स्थानकातील जणू पाहिजे स्वातंत्र्य दिनाच आहे की काय असे चित्र नजरेस पडले. भारत बांगलादेशाच्या सीमेवर शेवटची ड्युटी बजावून सेवानिवृत्त झालेले फौजी प्रकाश बाबुराव वैरागर यांचे स्वागत साठी ही सर्व तयारी होती. फौजी प्रकाश वैरागर हे लष्करातील सेवा पूर्ण झाल्याने मनमाड रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर गावचे या सुपुत्राचे ग्रामस्थ आणि मित्र परिवार यांनी जंगी स्वागत मनमाड रेल्वे स्थानकात केले. ओपन जीप मधून यांची मिरवणूक देखील काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले यामुळे प्रकाश वैरागर भारावून गेले होते.

लष्करातून निवृत्त होऊन गावी परतलेल्या बहुतांश सैनिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शहरापासून जवळ असलेल्या मनमाड - नांदगाव रोड वरील बुरुकुलवाडी येथे राहणाऱ्या प्रकाश बाबुराव वैरागर यांचे मनमाड रेल्वे स्थानकात जोरदार स्वागत करून ओपन जीप मधून मिरवणूक काढण्यात आली. ओपन जीपला तिरंगा आणि फुग्याने सजवले होते. 


           फौजी प्रकाश बाबुराव वैरागर गेल्या २३ वर्षापासून सीमा सुरक्षा दलात हवालदार पदावर कार्यरत होते. शेवटीची ड्युटी भारत-बांगलादेशच्या सीमेवर त्यांनी बजावली. लष्करातील सेवा पूर्ण झाल्याने मनमाड रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर गावच्या या सुपुत्राचे ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराने जंगी स्वागत केले. मनमाड रेल्वे स्थानकात काही काळ घोषणाबाजीने दणाणून गेला.मिरवणुकीदरम्यान ठिकाणी महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले या स्वागताने प्रकाश वैरागर भारावून गेले.देशासाठी २३ वर्ष सेवा देऊन फौजी प्रकाश जसे घरी आले तेव्हा यांचे आई,वडील व पत्नी यांचे मन अगदी भरून आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA