BHUMIPUTRA

मनमाड आय.यू.डी.पी. मध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम आनंदात साजराManmad IUDP Celebrate the yellow turmeric program in joyभुमीपुत्र न्यूज नेटवर्क

नांदगाव : प्रतिनिधीसौ. अंजूताई सुहास कांदे, मनमाडच्या नगराध्यक्षा सौ.पद्मावती धात्रक यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
 मनमाड आय.यु.डी.पी.येथील नगरसेवक गोपाल शिरसाठ तसेच नगरसेविका योगिता महेंद्र शिरसाठ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
 याप्रसंगी पारंपारिक वेशभूषा स्पर्धा उखाणे स्पर्धा संगीत खुर्ची यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
उपस्थित महिलांना हळदीकुंकू वाण वाटप करण्यात आले. 
महिलांनी आपल्या चाकोरीबद्ध जीवनातून बाहेर आले पाहिजे, फक्त हळदीकुंकवाच्या निमित्ताने आपण एकत्र येतो तसेच दैनंदिन जीवनात काहीतरी नवीन घडविण्यासाठी, आपलं सामर्थ्य सिद्ध करून दाखवण्यासाठी आपण नेहमी एकत्र आले पाहिजे असे आवाहन सौ.अंजुम ताई कांदे यांनी याप्रसंगी बोलताना केले
  यानिमित्ताने परिसरातील शेकडो महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA