BHUMIPUTRA

माघी गणेश जयंती उत्सव साधेपणाने साजराMaghi Ganesh Jayanti celebration is simply celebratedभुमीपुत्र न्यूज नेटवर्क
मनमाड : प्रतिनिधी

 भगवान श्री गणेशाचा वाढदिवस अर्थात माघी गणेश जयंती उत्सव दरवर्षी उत्साहात साजरा होतो. मात्र  यंदा कोरोनाच्या संकटामुळे शहरांतील विविध मंदिरांमध्ये श्री गणेश जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. धार्मिक कार्यक्रम भक्तीभावाने करण्यात आले.यानिमित्त शहराचे आराध्य दैवत श्री निलमणी गणेश मंदिरासह शहरातील सर्व गणेश मंदिरात अभिषेक पूजा , अथर्वशिर्षासह धार्मिक कार्यक्रम झाले . ओम गंगणपतये नमः च्या गजराने मंदिरे गजबजली होती.


                          सकाळपासून शहरातील सर्व गणेश मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी गर्दी उसळली. वेशीतील नीलमणी मंदिरात महाअभिषेक करण्यात आला.दुपारी सत्यविनायक पूजन करण्यात आले.श्री निलमणी गणेश मंदिरात सलग २६ व्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर साधेपणाने गणेश जयंती साजरी करण्यात आली.सकाळी महाअभिषेक झाला तर दुपारी सत्यविनायक महापूजा तर रात्री महाआरती करण्यात आली.भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.तसेच महाआरतीच्या वेळी श्री गणपती अथर्वशीर्ष पठण झाले.

                  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा माघी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. सकाळपासून नीलमणी गणेश मंदिरात गणेश भक्तांची गर्दी उसळली होती.उत्सवाचे आयोजन निलमणी गणेश मंदिर ट्रस्टने केले.मंदिरात आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली . मान्यवरांच्या उपस्थितीत श्रींची महाआरती झाली . ट्रस्टतर्फे महाप्रसाद वाटण्यात आला . फुलांची आकर्षक सजावट फेटा , विविध अलंकार , फळ आणि फुलांची सजावट अशा थाटात श्री निलमणीची सजविलेली मूर्ती भाविकांच्या नजरेस पडत होती.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA