BHUMIPUTRA

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना शिधापत्रिका वाटपDistribution of ration cards to disabled beneficiaries under National Food Security Scheme


भुमीपुत्र न्यूज नेटवर्क
नांदगाव : प्रतिनिधी


    आमदार सुहास अण्णा कांदे संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून तसेच प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या सहकार्याने नांदगाव मतदारसंघातील दिव्यांग नागरिकांना पिवळी शिधापत्रिका चे वाटप करण्यात आले.
 कुटुंबासोबत एकत्र राहणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना शिधापत्रिकेत नाव असून पात्र व पात्र असून देखील शिधापत्रिकेवर अनुज्ञेय असलेला अन्नधान्याचा लाभ  मिळत नव्हता व अन्नधान्यापासून वंचित रहावे लागत होते. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना धान्य मिळावे यासाठी दिव्यांगांना स्वतंत्र शिधापत्रिका देण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे, त्या नुसार नांदगाव मतदारसंघातील 12 दिव्यांगांना काल (दि.4) नांदगाव चे तहसीलदार सिद्धार्थ मोरे, शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिस शेख अब्बास यांच्या हस्ते पिवळी शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले.
    आ.सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव मतदार संघात शिवसेना पक्ष पदाधिकारी व शिवसैनिक प्रत्येक गरजवंतास शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. शासकीय योजनांपासून गरजू व गोर गरीब जनता वंचित राहता कामा नये या उद्देशाने शिवसैनिक काम करत आहेत.
        नांदगाव तालुक्यातून आतापर्यंत 280 दिव्यांगांचे प्रकरण जमा केले असून 52 लोकांना शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.लवकरच उर्वरित शिधापत्रिका टप्प्या टप्प्यात वाटप करण्यात येणार आहेत.
    या प्रसंगी मार्केट कमिटी उपसभापती राजाभाऊ देशमुख, शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव, युवासेना तालुका प्रमुख सागर हिरे,अय्याज शेख,आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA