BHUMIPUTRA

मुख्यधिकारी डॉ.मुंढे यांची तडकाफडकी बदली ; नवनियुक्त मुख्याधिकारी सचिन कुमार पटेल रुजूChief Officer Dr. Mundhe's sudden replacement; Newly appointed Chief Officer Sachin Kumar Patel Rujuभुमीपुत्र न्यूज पोर्टल
मनमाड : प्रतिनिधी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि प्रशासक अधिकारी म्हणून काम पाहणारे डॉ.विजयकुमार मुंढे यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आले असून त्यांच्या जागेवर कळवन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सचिन कुमार पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

             मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल यांनी शनिवारी दि. ५ रोजी मनमाड नगर परिषदेचे कारभार स्वीकारला आहे. नवनियुक्त मुख्याधिकारी पटेल यांचा महाराष्ट्र नगरपरिषद , नगरपंचायत कर्मचारी , संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी किरण आहेर , प्रमोद सांगळे , दिपक पांडे , कैलास पाटील ,जावेद शेख , सुशांत राजगुरु , रमेश थोरे , प्रविण जोशी आदि  कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान डॉ विजयकुमार मुंडे यांची अचानक बदली झाल्याने शहरात विविध चर्चेला उधाण आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA