BHUMIPUTRA

स्व.सरस्वती इच्छाराम धामणे महिला बहुदेशीय संसथेच्या वतिंने हऴदी कुंकवाचा उत्सव आनंदात साजराभुमीपुत्र न्यूज नेटवर्क

नांदगाव : प्रतिनिधी


नांदगांव शहरातील सामाजिक संस्था स्वर्गीय सरस्वती इच्छाराम धामणे महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने काल रविवारी माऊली मंदिर नांदगांव येथे हळदी कुंकवाचा सण साजरा करण्यात आला.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सौ. अंजुमताई कांदे या उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून कोषाध्यक्ष ग्रामीण विकास शिक्षण संस्था नम्रता पगार, सरपंच मंगला ताई नांवदर, शुभांगी धामणे, शिवसेना महिला आघाड़ी जिल्हा उपाध्यक्ष संगिता बागुल बोराऴे सरपंच भारती पवार,उज्वला ताई खाडेमहिला आघाड़ी शहर शिवसेना प्रमुख रोहिणी मोरे ,या उपस्थित होत्या.
स्व. सरस्वती इच्छाराम धामणे महिला बहुदेशीय संसथेच्या अध्यक्ष सपना अनिल धामणे, उपाध्यक्षा सुशिला पारख, खजिनदार अनुपमा राजेंद्र लोढ़ा कार्यक्रमात अनेक प्रकारच्या खेऴात  महिलानी सहभाग घेतला विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. मोनिका कासलीवाल, गीतारत्न पारखी, निलम कासलीवाल,शेवता चोपड़ा माधुरी सुराणा,वेलावंती सोनवणे या बक्षीसास पात्र ठरल्या.
    कार्यक्रम यशस्वी करने साठी सुशिला महिला मंडल अध्यक्ष मनिषा पारख , आशा सुराणा, सिम्ता दडगहाऴ तसेच सुत्रसंघालन माधुरी सुराणा यांनी केले तर आभार जयश्री सुराणा यांनी मानले

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA