भुमीपुत्र न्यूज पोर्टल
मनमाड : प्रतिनिधी
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे विश्वस्त डॉ.अद्वयआबा हिरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त "अद्वय रंगभरण स्पर्धा व अद्वैत धर्म संवाद या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी भन्तेजी दीपंकर , गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजीतसिंहजी, सेंट फ्रांसिस झेवियर चर्चचे मुख्य धर्मगुरू रेव्हरंड फादर सहायराज फर्नांडो, जामा मशिदचे मौलाना अस्लम रिझवी हे सर्व धर्मगुरु उपस्थित होते. सर्व धर्मगुरूंनी आपल्या मनोगतातून माणुसकी व मानवतावाद हाच खरा धर्म आहे हे विशद केले. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि या विविधतेत एकता आहे. माणसातच देवपण शोधावे . मनुष्या मध्येच देव दडलेला असतो. मानव जरी विविध धर्माचे आचरण करीत असला तरी सर्व धर्माची विचारधारा व शिकवण एकच आहे. असे विचार सर्वांनी मांडले. त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की जगामध्ये एक सुपर पावर आहे आणि ही सुपर पावर म्हणजेच देव आहे प्रत्येक धर्माचे लोक या सुपर पावर चे अस्तित्व जाणून आपापल्या पद्धतीने भक्ती व उपासना करतात. त्याच बरोबर त्यांनी मानवतावाद व विविधतेत एकता भारतात कशी नांदते या विषयी माहिती दिली. सहिष्णुतेची व मानवतेचे शिकवण देखील प्रत्येक धर्मातुन दिली जाते. असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. कविता काखंडकी यांनी केले तर प्रास्ताविक प्रा .एन ए. पाटील व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विष्णू राठोड यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी. जी. आंबेकर कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या सौ. ज्योती पालवे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड, कुलसचिव समाधान केदारे सर्व प्राध्यापक वृंद कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
फोटो
मनमाड : अद्वैत धर्म संवाद कार्यक्रमात बोलताना प्राचार्य डॉ. ए. व्ही.पाटील, बाजूस सर्व धर्मगुरू
Tags:
मनमाड