BHUMIPUTRA

दत्ताचे शिंगवे येथे श्री दत्त जयंती साध्या पद्धतीने साजरी : यात्रोत्सव रद्द
मनमाड : प्रतिनिधी
       येथुन जवळच असलेल्या दत्ताचे शिंगवे येथील अतिशय प्राचीन असणारे श्री दत्त मंदिर येथील यंदाच्या वर्षीच्या  श्री दत्त जन्मोत्सव सोहळा अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.दर वर्षी दत्त जयंतीनिमित्त मंदिर ट्रस्ट आणि मेसनखेडे ग्राम पंचायत द्वारे तीन दिवस भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येत असते.या मध्ये तीन दिवस महाराष्ट्रातील अनेक गावातील हजारो भाविक हे श्री दत्त मंदिर येथे दर्शनासाठी येत असतात, परंतु यंदाच्या वर्षी कोरोना विषाणूच्या  परिस्थिती मुळे मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार यंदाचा यात्रोत्सव रद्द करण्यात आलेले आहे.दि.28 ते 30 डिसेंबर या कालावधीत खेळणी-पाळणे दुकाने , मिठाई दुकाने , कलावंत कार्यक्रम , इतर सर्व प्रकारची दुकाने कोणीही लावू नयेत.भाविकांनी आपल्या घरूनच श्री दत्त प्रभूंचे दर्शन घ्यावे. जमाव करून गर्दी करू नये , अशा प्रकारचे आदेश मा.जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहे.

   येथील श्री दत्त प्रभूंचे मंदिर हे साधारण 300 ते 350 वर्ष पुरातन असुन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराची बांधणी केलेली आहे.शिंगवे येथील श्री दत्त प्रभूंचे हे ठिकाण महानुभाव पंथातील एक महत्वाचे आणि पवित्र स्थान असुन महाराष्ट्रातील अनेक गाव आणि शहरातील महानुभाव पंथातील अनेक भाविक हे येथे येत असतात.मंदिर परिसर अतीशय सुंदर असुन एक छोट्याशा डोंगरावर श्री दत्त मंदिर आहे.मंदिराच्या पायथ्याशी देवी मातेचे मंदिर असुन मंदिरा पर्यंत जाण्यासाठी साधारण 100 ते 150 पायऱ्या चढुन वर जावे लागते.मंदिरा समोर भव्य सभामंडप असुन मंदिराच्या गाभाऱ्या मध्ये एकमुखी श्री दत्त महाराजांची सुंदर आणि आकर्षक मुखवटा असणारी मुर्ती आहे.दर गुरुवारी आणि महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी देखील अनेक भाविक हे येथे दर्शनासाठी येत असतात.श्री दत्त प्रभूंचे हे जागृत स्थान असुन अनेक भाविक येथे आपल्या मनोकामना पुर्ण करण्यासाठी नवस देखील करत असतात.

   गेल्या अनेक वर्षांपासून श्री दत्त मंदिर येथील श्री दत्त प्रभूंच्या पुजेचा आणि सेवेचा मान हा येथीलच श्री शेवलेकर परिवार यांच्याकडे असुन सध्या त्यांची चौथी ते पाचवी पिढी ही श्री दत्त प्रभूंच्या सेवे मध्ये आहे.

   श्री दत्त मंदिराच्या इतिहासात यंदाच्या वर्षी प्रथमच श्री दत्त जयंती निमित्त आयोजित यात्रोत्सव रद्द करण्याचा प्रसंग आलेले आहे.

   आज आपण शिंगवे येथील श्री दत्त मंदिराचे छायावृत्त पाहुया....

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA