BHUMIPUTRA

शाळेची यशोगाथा

शाळेची यशोगाथा
निसर्गाच्या वनराईत नटलेली शाळा-जि.प.प्राथमिक शाळा हॕरिसन ब्रँच(जे.कुंभारी), 
मधुकर वक्ते अहमदनगर प्रतिनिधी. 'फळाफुलांचा मळा पाहिजे
आनंदाचा सोहळा पाहिजे 
गावात एक वेळ देऊळ
नसले तरी चालेल
पण एक आदर्श  शाळा पाहिजे.'
 अशाच एका आनंददायी शाळेची यशोगाथा तुमच्यापुढे सादर होत आहे. अहमद नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात नगर -मनमाड या हायवेने पाटाच्या कडेने थोड आत गेलं कि ,रस्त्याने तूमच्या स्वागताला हजर असतात  आंब्याची ,लिंबाची व जांभळाची झाडे अन्  त्याच्या जोडीला पाटातून खळाळत वाहणारे पाणी .या पाटाच्याच कडेला उंच  उंच बदामाच्या वनराईत व निसर्गाच्या  सानिध्यात असणारी जि.प.प्राथमिक  शाळा  हॕरीसन ब्रँच .या शाळेचा इतिहासही मोठा रंजक आहे .
  हॅरीसन ब्रँच शाळा ही १२/१२/१९३६ मध्ये इंग्रज अधिकारी Harison याने तिनचारी,जेऊर कुंभारी येथे सुरु केलेली शाळा. Harison हा  इंग्रज अधिकारी या चारीवर पाटकरी म्हणजेच चारीचे पाणी सोडायला नेमणूक केलेला अधिकारी  होता.या परिसरात त्याने पाटाच्या कडेने आंब्याचे,लिंबाचे,तसेच जांभळाचे भरपूर झाडे लावले होते.त्यामुळे हा परिसर हिरवाईने नटलेला अजूनही आहे. सदर शाळेचा जिर्णोद्धार गावातील ज्येष्ठ नागरीक लहानूभाऊ नागरे यांनी करुन स्वतःची जागा शाळेसाठी दान करून १० खोल्यांची भक्कम अशी इमारत L आकारात बांधून दिले.व शाळेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन गृहमत्र्यांच्या हस्ते केले होते.एकेकाळी कोपरगाव तालुक्यातील ३५० ते ४०० पटसंख्येने सर्वात मोठी असलेली शाळा आता  ४५ पटावर आपलं अस्तित्व टिकवायचा प्रयत्न करतेय.शाळेला अवकळा येण्याचे कारण   या परिसरात नव्याने सुरु झालेल्या शिक्षण संस्था,इंग्रजी माध्यमाच्या शाळा,पालकांचा जि.प.शाळा बद्दलचा दृष्टीकोन तसेच तत्कालीन शिक्षक. 
   अशा स्थितीत सन २०१७-१८ ला शाळेत बदलून आलेत नवीन शिक्षक  श्री.नवनाथ सूर्यवंशी सर.                   वरील परिस्थिती पाहिल्यानंतर शाळेला पुन्हा ते वैभव तर मिळवून देऊ शकत नाही.पण अस्तित्व टिकवून ठेऊ शकतो,पालकांचा जि.प. शाळेबाबतचा दृष्टीकोन बदलू शकतो. हा मानस त्यांनी  पक्का केला. या दृष्टीने सहकारी शिक्षिका मनिषा शिंपी यांच्या सहकार्याने शाळेत खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्यास त्यांनी सुरुवात केली .

१) शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीसाठी EVM चा वापर - आमच्या जि.प.शाळेत शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शालेय मंत्रिमंडळ निवडणूक voting machine aap TABचा वापर करून करण्यात आली.अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच आमच्या जिल्हा परिषद शाळेत EVM च्या पद्धतीनेच घेण्यात आले.सदर शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीसाठी आमच्या जेऊर कुंभारी गावाचे सरपंच सौ.साविताताई दळवी,उपसरपंच यशवंत आव्हाड उपस्थित होते.तसेच चांदेकसारे केंद्राचे केंद्रप्रमुख व ग्रामस्थ उपस्थित होते.सदर उपक्रमाची प्रसार माध्यामानीही दखल घेतली.
२) परिपाठ व अध्यापनासाठी KARAOKE MIC चा वापर – संगीतमय परिपाठ होण्यासाठी कराओके माईक फारच उपयुक्त होत आहे.ग्रामीण भागात वीज भारनियमनामुळे विजेचे लपंडाव चालू असतात.त्यावर उपाय म्हणून कमी खर्चात ब्लूटूथ माईक वापरून आमच्या शाळेने परिपाठात व अध्यापनात रंजकता आणली आहे.
३) विविध APP चा वापर – वेगवेगळ्या ANDROID APP चा वापर करून शालेय अध्यापनात मनोरंजकता आणली.उदा.animal 4D,plickers,ezeetest,AR effect,Diksha app,bolo app,read to learn,e pathshala,jungal safari etc.
४) संगणक शिक्षण – microsoft word,paint द्वारे सर्व विद्यार्थ्यांना कॉम्पुटर चे प्राथमिक ज्ञान दिले जाते.
५) व्हिडिओ निर्मिती – शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भातील शैक्षणिक व्हिडीओ तसेच शाळेच्या वेगवेगळ्या उपक्रमांचे व्हिडीओ शाळेच्या ‘शिक्षणधारा’ या youtube channel वर अपलोड करून इतर शिक्षक,पालक व विद्यार्थीही सदर व्हिडीओ पाहतात.
you tube वरील स्वनिर्मित व इतर शैक्षणिक व्हिडीओ,अहमदनगर zp ने राबविलेल्या ‘we learn english’ audio,diksha app व इतर शासकीय शैक्षणिक software चा वापर अध्यापनात केला.karaoke mike,skype video calling etc.
६) वेबसाईट - शाळेच्या www.shikshandhara.com या ब्लॉगवर शाळेतील उपक्रम तसेच पालक,विद्यार्थी व शिक्षकांसाठी उपयुक्त माहिती वेळोवेळी अपडेट केली जाते.
७) skype in the classroom – microsoft च्या या उपक्रमांतर्गत आमच्या शाळेतील विद्यार्थी जगातील कोणत्याही देशातील skype द्वारे विद्यार्थी व शिक्षकांशी संपर्क साधून संवाद साधतात.भाषेची अडचण असूनही एकमेकांच्या भावना समजावून घेऊन mystery skype सारखे उपक्रम आमच्या शाळेत राबविले जातात.इतर देशाची संस्कृती,तेथील शिक्षण व्यवस्था,देशाची प्रतीके,प्राणी,वनस्पती यांची माहिती करून घेतले जातात.तसेच पर्यावरण संवर्धन,प्लास्टिक बंदी,ग्लोबल वॉर्मिंग याबद्दल चित्र व व्हिडीओ च्या सहाय्याने एकमेकांना माहिती पुरवली जाते.
८) VR BOX - VR BOX चा वापर करून विद्यार्थ्यांना virtual reality चा अनुभव करून दिला जातो.त्यासाठी मोबाईल मध्ये VR Thrills, VR Abyss,VR Jurassic अशाप्रकारचे app घेऊन अध्यापनात योग्य प्रमाणात वेळोवेळी तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर केला जातो.
९) read to right,diksha - या शासकीय software चा शाळेतील विद्यार्थ्यांना पुरेपूर वापर करून दिला जातो.
१०) पालक व शिक्षक whats up group – विद्यार्थ्यांची प्रगती,विद्यार्थ्यांचा घरचा अभ्यास,विद्यार्थ्यांच्या गैरहजेरी बाबत सदर ग्रुपवर मार्गदर्शन केले जाते.तसेच शाळेतील उपक्रम पालकांपर्यंत वेळोवेळी पोहचवले जातात.
११) लेखक आपल्या  भेटिला -
हॕरीसन ब्रँच शाळेत राबविलेल्या उपक्रमाची तालुकास्तरीय तंत्रस्नेही प्रशिक्षणात माहिती करून दिली.तसेच मासिक शिक्षण परिषदेत तंत्रस्नेही व उपक्रमशील शाळा म्हणून केंद्रातील शिक्षक व केंद्रप्रमुख यांचा ‘मिठाचा शोध’पाठाच्या लेखिका अंजली अत्रे यांच्याशी video conference द्वारे संवाद साधून देऊन सदर उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले.
१२) कोपरगाव तालुक्याची जि.प.शाळेची जाहिरात सन २०१९/२० तत्कालीन beo यांच्या मार्गदर्शनाने video तयार करून सोशल मिडिया द्वारे समाजापर्यंत प्रसारित केला.
१३) microsoft educator expert या skype ग्रुप च्या माध्यमातून वेगवेगळ्या देशातील विद्यार्थी व शिक्षकांशी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी संवाद साधला आहे.तसेच virtual field trip च्या माध्यमातून yellow stone national park ला भेट..........flipgrid च्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांचा video द्वारे विविध उपक्रमात सहभाग....
१४)  जि.प.शाळेत तंत्रस्नेही उपक्रमांतर्गत जे काही उपक्रम राबविले गेले आहे त्यामुळे विद्यार्थ्यामधील इंग्रजी विषयाची भीती नाहीसी होऊन ते आत्मविश्वासाने इंग्रजीतून संवाद साधत आहेत.तसेच तंत्रज्ञानाच्या वापरातून अध्ययन सोपे झाल्यामुळे अभ्यासाचा कंटाळा येत नाही.तसेच शाळेत राबविलेल्या उपक्रमाची माहिती video द्वारे you tube,वर्तमानपत्र,facebook व whats up द्वारे शिक्षक व समाजापर्यंत पाठविले जात आहे.त्यामुळे इतर शिक्षकही आवर्जून आपल्या शाळेत सदर उपक्रम राबविताना दिसून येतात. तालुकास्तरावर मा.beo यांनी तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर करण्यासंदर्भात ज्या कार्यशाळा घेतल्या त्या कार्यशाळा मध्ये आमच्या शाळेतील उपक्रम तसेच तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा याबाबत तालुक्यातील शिक्षकांना मार्गदर्शन करायची संधी या शाळेतील शिक्षक श्री.नवनाथ सूर्यवंशी यांना मिळाली.
 तंत्रज्ञानाच्या वापरामुळे समाजाचा या जि.प.शाळेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.यामध्ये प्रसारमाध्यमांचाहि मोलाचा वाटा आहे.याबरोबरच पुढील उपक्रम  ही या शाळेत राबवले जातात.
🍁नाविन्यपूर्ण शाळा प्रवेशोत्सव 
🍁शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीसाठी EVM चा वापर 
🍁सप्तरंगी परिपाठ
🍁थोर नेत्यांच्या जयंती,पुण्यतिथीनिमित्त बालसभांचे आयोजन 
🍁मनोरंजक व नाविन्यपूर्ण खेळ 
🍁पालकांचा whats up ग्रुप 
🍁शेतकरी व व्यावसायिकांच्या मुलाखती 
🍁क्षेत्रभेट (डाकघर,प्राथमिक आरोग्य केंद्र)
🍁mystery skype इतर देशातील शिक्षक व विद्यार्थ्यांबरोबर 
🍁मुलांचा वाढदिवस साजरा करणे 
 🍁शालेय wall compound आकर्षक रंगकाम 
🍁खेळाचे साहित्य,लेझीम यांचा पुरेपूर वापर 
🍁अभ्यासक्रमावर शैक्षणिक video निर्मिती 
🍁संगणकाच्या तासिकेचा वेळापत्रकात समावेश
 आसे विविधरंगी उपक्रम  या शाळेत राबवण्याबरोबरच शाळेतील पालकांचा विश्वास  संपादन करण्यात शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.नवनाथ सूर्यवंशी सर व सहशिक्षिका श्रीम.मनिषा शिंपी यांनी यश मिळवले आहे . त्याचबरोबर चांदेकसारे केंद्राचे उत्साही ,हसतमूख केंद्रप्रमूख आदरणीय श्री.दिलीपराव ढेपले साहेब यांचे वेळोवेळी अनमोल मार्गदर्शन व सहकार्य  नेहमीच असते.या मूळेच शाळेत  विद्यार्थी  उपस्थिती  शंभर  टक्के असते. या शाळेतील मुले बहूतांशी गरीब घरातील आहेत. मात्र  गुणवत्तेच्या बाबतीत ही सरस आहेत .आज इंग्रजी  शाळाचे वाढते प्रस्थ लक्षात  घेता  आजही ही शाळा भक्कम पाय रोवून उभी आहे.व या शाळेची गुणवत्तेकडे यशस्वी वाटचाल सुरु आहे .अशा या निसर्गरम्य  शाळेस  नक्कीच  भेट द्यायलाच हवी.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA