BHUMIPUTRA

जायकवाडीतील पाण्याचे अनियोजित व्यवस्थापनामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा : अनिता पाटील वानखडे

जायकवाडीतील पाण्याचे अनियोजित व्यवस्थापनामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई   करा : अनिता पाटील वानखडे

औरंगाबाद / प्रतिनिधि 
मराठवाड्यातील  तहान भागवणार्या 
जायकवाडी धरणातील पाण्याचे अनियोजित व्यवस्थापन केल्यामुळे मोठया प्रमाणात सोडलेल्या पाण्यामुळे पैठण तालुक्यात निर्माण झालेल्या पुरसदृश्य परिस्थितीस जिम्मेदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी 
राष्ट्रवादी महिला  कांग्रेस च्या  अनिता पा वानखडे यांनी केली आहे.
 जायकवाडी धरणातील पाण्याचे अत्यंत ढिसाळपणे नियोजन केल्यामुळे आज धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे.ज्या मुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून नदीकाठच्या लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.हे सर्व कालबद्ध पाण्याचे नियोजन नसल्याने झालेले आहे.
जर याचे नियोजन व्यवस्थित असले असते तर ही परिस्थिती टाळता आली असती.अशी अनिता वानखड़े यांनी दिली. व सदरिल परस्थितिस जबाबदार असलेल्या  संबंधित विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने ही गंभीर वेळ आलेली आहे त्या दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी व या पुढे असे धोके निर्माण होणार नाहीत या साठी लवकरात लवकर  योग्य तो निर्णय घ्यावा असे प्रतिपादन अनिता पा.वानखडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA