BHUMIPUTRA

कोविड-१९ रक्षकांना माक्सचे वाटप

कोविड-१९ रक्षकांना माक्सचे वाटप

जळगाव I सतीशसिंग परदेशी
           कोविड-१९ कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी कोविड-१९ रक्षकांना सामाजिक कार्यकर्ता कविता माळी व भारती मस्के यांनी मास्क वाटप केले.
                   जळगाव जिल्ह्यातील विविध भागात सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्यांना जवळपास 1000 हून अधिक मास्क वाटप करण्यात आले.सामाजिक कार्यकर्त्या सौ. सविता माळी  राहणार वरणगाव व महाराष्ट्र रक्षक ग्रुपच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष व कौन्सिलर सौ भारती मस्के, जळगाव यांच्यामार्फत सुरक्षा रक्षक यांना कोविड-१९ कोरोना योद्धा मध्ये डॉक्टर्स,नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी यांच्यासारखा सुरक्षा रक्षकांचा सुद्धा खूप महत्वाची कामगिरी व जबाबदारी पार पाडत आहेत. रक्षक कर्मचारी कार्य करीत आहेत.त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी सामाजिक कार्यकर्ता सविता माळी  आणि भारती मस्के  यांनी जळगाव जिल्ह्यात माक्स वाटप केले. या दोन्ही महीलांचे सामाजिक क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. 
               

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA