BHUMIPUTRA

दिंडोरी मतदार संघाचे खासदार डॉ भारती पवार यांनी शहरातील कोविड-१९ सेंटर आणि गुरुद्वाराला दिली भेट

दिंडोरी मतदार संघाचे खासदार डॉ भारती पवार यांनी शहरातील कोविड-१९ सेंटर आणि गुरुद्वाराला दिली भेट
मनमाड I प्रतिनिधी
                मनमाड येथील शीख धर्मीयांच्या श्रद्धास्थान असलेल्या गुरुद्वाराच्या वतीने तीन महिने ताळेबंदिच्या काळात शहरातील गोरगरिबांना,नाष्टा,चहापाणी जेवण पुरविले असल्याने दिंडोरी मतदार संघाच्या भाजपच्या खासदार  डॉ.भारती पवार यांनी  आज गुरुद्वाराला भेट देऊन गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रणजीत सिंग यांचे सन्मानपत्र आणि शाल श्रीफळ देऊनगौरव करण्यात आले. तसेच त्यांच्या कार्याचे कौतुक गौरव करण्यात आले.
             
            खासदार डॉ. भारती पवार यांनी आज मनमाड शहराला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भेट देऊन शहरातील सेंट झेवियर येथील कोविड-१९ सेंटरला भेट देऊन तेथे रुग्णांची विचारपूस  करून डॉक्टरांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी येथील प्रसिद्ध शीख धर्मिय यांचे गुरुद्वारामध्ये गेले तीन महिने  ताळेबंदिच्या काळात हजारो गोरगरीब अनाथांना नागरिकांना गुरुद्वाराच्या वतीने चहा नाश्ता जेवण करून चांगले काम केल्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले. तसेच यापुढे गुरुद्वाराला कुठलीही मदत लागल्यास मी तयार आहे असेही ही त्यांनी यावेळी सांगितले. तर प्रशस्तीपत्र देऊन गुरुद्वाराला गौरविण्यात आले.यावेळी भाजपाचे उपजिल्हा अध्यक्ष नितीन पांडे ,माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार ,माजी नगरसेवक सचिन दराडे ,गुरुजितसिंग कांत, कांतीलाल लूनावत,नारायण पवार, एकनाथ बोडके, नितिन आहेरराव,कुलदीपसिंग कांत,सुरजित सिंग कांत सुरजितसिंग चावला,परवीनसिंग ठकराल, सतपालसिंग कांंत, जसविंदरसिंग ठकराल, बल्बिरसिंग कांंत,जितेंद्रसिंग रिसम,
  आदीसह  व नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA