शहरात नव्याने १७ कोरोना बाधितांची भर ; उपजिल्हा रुग्णांलयाचे अधिक्षक बाधित आल्याने शहरात चर्चेला उधाण
मनमाड I प्रतिनिधी
शहरातील विविध भागात राहणारे १७ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला असून त्यामध्ये एक रुग्ण हा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षकांचा अहवाल कोरोना बाधित आले. यापुर्वी उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले कार्यालयीन अधिक्षक यांचा देखील अहवाल कोरोना बाधित आला होता. यामुळे उपजिल्हा रुग्णालय कोरोनाचे हॉटस्पॉट तर होत नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे रुग्णालयात जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना धडकी भरली असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील २३ जणांचे अहवाल कोरोना चाचणी करीता पाठवले असता त्यापैकी १५ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले असुन शहरातील दोन रुग्ण हे खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी गेले त्याचां अहवाल देखील बांधित आल्याने शहरात आज सायंकाळपर्यंत शहरात १७ रुग्णांची भर पडली आहे.
मनमाड उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील अधीक्षक कोरोना बाधित झाले असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहे. रूग्णलय तसेच कोरोना बाधितांचा परीसर निर्जंतुकीकरण करण्यात आले.
कोट:
सध्या मनमाड शहरात कोरोना बाधितांची संख्या १७३ वर पोहचली असुन त्यातील १२६ रुग्ण बरे झाले आहेत. उपचारा दरम्यान ५ रुग्णांचा मृत झाले असुन सध्या मनमाडच्या कोविड सेंटर मध्ये २८ रूग्णांवर उपचार सुरू असुन १४ रूग्ण हे असलेल्या नाशिक ,चांदवड़ व इतरत्र उपचार घेत आहे. - अजहर शेख, नगररचना विभाग, न पा
Tags:
कोरोना