विंचूर (भाऊसाहेब हुजबंद)
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे प्रशासनाचा गोंधळ उडाला आहे. याचा फायदा घेत मोठ--मोठाली खाजगी हाँस्पिटलं जाणीवपूर्वक गोंधळ घालून चंगळ करीत आहे.गेल्या आठवड्यात दि.18 जुलै रोजी येथील एक 39 वर्षीय रुग्ण नाशिक येथील वोक्हार्ट या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल झालेला आहे.त्याच दिवशी त्याच्या घशातील स्वँबचे नमुने तपासणी साठी घेण्यात आले. परंतु आजवर त्याचा अहवाल प्राप्त झाला नाही.त्यानंतर दोन दिवसांनी या रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांचे स्वँबचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले. व त्यांचे अहवाल येऊन तीन दिवस झाले. तरी सदर रुग्णाचा अहवाल प्राप्त झालेला नाही.रुग्ण कुठल्याही खाजगी रुग्णालयात उपचार घेऊ शकतो. परंतु तो जर कोरोना बाधित असेल तर जिल्हा वैद्यकीय अधिकारी किंवा संबंधित यंत्रणेला त्याचा अहवाल देणे बंधनकारक आहे.व जिल्हा वैद्यकीय अधिकारी संबंधित प्रशासनास याबद्दल माहिती देत असतात. परंतु सदर रुग्णाची माहिती आजतागायत ना विंचूर आरोग्य अधिकार, ग्रामपालिका प्रशासन, महसुलचे तलाठी यापैकी कुणालाच नाही.किंवा सदर रुग्णालयाने माहिती दिली. परंतु प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे स्थानिक प्रशासनास याची माहिती मिळाली नाही. सदर रुग्ण कोरोना बाधित आहे. किंवा नाही. जर असेल तर त्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना का देण्यात आलेली नाही. आणि जर बाधित नसेल तर दाखल का करुन घेतले. की फक्त रुग्णाला बाधित आहे.अशी भिती घालून दाखल करून घेणे व आर्थिक चंगळ करणे असा उद्देश तर नाही ना अशी शंका येऊ लागली आहे. कोरोनाच्या वैश्विक महामारीने राज्यासह नाशिक जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे.आजवर जिल्ह्यात दहा हजाराच्यावर कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.रुग्णांच्या तपासणी साठी शासनाच्या वतीने नाशिक येथे कोरोना तपासणी केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.परंतु येथे करण्यात आलेल्या तपासणीत काही रुग्ण पाँझीटीव्ह आले. तेच रुग्ण खाजगी तपासणीत निगेटिव्ह आढळतात. प्रशासनाच्या या सावळ्या गोंधळा मुळे गोंधळलेले नागरिक खाजगी रुग्णालयां कडे वळू लागले.एका बाजूला याचा फायदा घेत काही मोठ मोठ्या खाजगी रुग्णालयांची चंगळ चालू आहे.तर दुसऱ्या बाजूला छोट्या गावातील डॉक्टर असोसिएशन रुग्णांच्या काळजी पोटी स्वखर्चाने रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या औषधांचे वाटप करीत आहेत.
Tags:
कोरोना