मनमाड I प्रतिनिधी
गेली कित्येक दिवसांपासून कोरोनाव्हायरस रोगाने या शहरात थैमान मांडले असून संबंधित आरोग्य विभागाचा ढिसाळपणा व नाकर्तेपणा दिसून येत आहे.अक्षरशा रुग्णांवर वाऱ्यावर सोडून दिले जात आहे.शहरात रुग्णांचा आकडा दोनशेवर गेला असून प्रशासन फक्त दिखाऊपणा दाखवत आहे.गरीबाकडे अजिबात लक्ष दिले जात नाही.शहरातील जे केंद्र आहे तेथे साफसफाई नाही त्यामुळे त्या लोकांचे आरोग्य अजून बिघडत चालल्याने प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालून त्यांना सुविधा पुरवाव्यात अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा कार्यध्यक्ष तथा नगरसेवक गंगाधर त्रिभुवन यांनी दिला आहे.
शहरातील ग्रामीण रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय असून येथे आद्यवत काहीच यंत्रणांनाही वेंटीलेटरची कमतरता असून कुठल्याच उपयोजना नाही तसेच शहराजवळ २४ किलोमीटरवर चांदवड येथे कोरोना रुग्ण केंद्र असून तेथे फक्त धनदांडग्याना प्रवेश दिला जातो तसेच गरीब रुग्णांना चांदवड येथून परत मनमाडला यावे लागते नंतर नाशिक सिविल हॉस्पिटलला पाठविले जाते नंतर तेथेही बेड शिल्लक नाही.असे सांगितली जाते.तेथून m.v.p. चा अशी सबब रस्ता दाखविला जातो तेथे जागा नसल्यामुळे रुग्णास फिरवले जाते रुग्ण रात्रभर फिरत असतो कुठलीच शासकीय सोय किंवा लाभ मिळत नाही त्यात दोघांची प्रकृती खालावली जाते शेवटी एक नर्स रुग्णाला पुन्हा नाशिक येथे रुग्णालयात भरती करून घेते जर रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्यास त्यास ॲडमिट होण्याचा तगादा लावला जातो व जोपर्यंत तो जात नाही तोपर्यंत पोलीस डिपार्टमेंट तर्फे दाखविला जातो व नंतर रुग्ण वाऱ्यावर त्याची कुचंबणा व हेळसांड केली जात आहे
मनमाड ग्रामीण रुग्णालयात अद्ययावत आरोग्य यंत्रणा उभारावी कारण की मनमाड शहराची लोकसंख्या सव्वा ते दीड लाख वस्तीचे शहर आहे तसेच ग्रामीण भागातील रुग्ण सुद्धा भरपूर येतात तरी लवकरात लवकर आद्यवत आरोग्य यंत्रणा उभारावी तसेच सेंट झेवियर हायस्कूल दिवसाआड निर्जंतुकीकरण करावे तसेच दररोज साफसफाई करावे.रुग्णांना मागे शासकीय लाभ मिळत असतो त्याचाही लाभ रुग्णास मिळत नाही तेथेही सावळागोंधळ चालू आहे.याकडे शासनाने तातडीने सदर यंत्रणा सुधारण्यात यावी अन्यथा रिपाई आठवले गट तीव्र आंदोलन करून संबंधित प्रशासनास धारेवर धरेल अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे नगरसेवक तथा जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर त्रिभुवन यांनी दिले आहे.
Tags:
कोरोना