BHUMIPUTRA

सिन्नर तालुक्यातील कोरोनाचे तेहतीस रूग्णांची दोन दिवसात घरवापसी ; सिन्नर तालुक्यात गेल्या दोन दिवसांत एकही रूग्ण आढळला नसल्याने समाधानाचे वातावरण

*सिन्नर तालुक्यातील कोरोनाचे तेहतीस रूग्णांची दोन दिवसात घरवापसी ; सिन्नर तालुक्यात गेल्या दोन दिवसांत एकही रूग्ण आढळला नसल्याने समाधानाचे वातावरण*

*_सिन्नर | प्रतिनिधी_*
सिन्नर तालुक्यात आजपर्यंत करोनामुळे ५०२ रूग्णांची संख्या झाली असुन, सर्वात महत्वाचे म्हणजे गेल्या दोन दिवसात एकही नविन रूग्ण नसल्यामुळे तालुक्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दि. २१ तारखेपासुन सिन्नर शहरात कडेकोड लॉकडाऊन पाळण्यात आल्यामुळे रूग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. आणि गेल्या दोन दिवसांत तेहतीस रूग्णांना घरी सोडण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रूग्णालयाच्या अधिक्षीका डॉ. निर्मला गायकवाड, आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, व डॉ. लहु पाटील यांनी दिली.
            सिन्नर मधील व्यापारी संघटनेनी व प्रशाकिय प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसिलदार राहुल कोताडे, यांच्या बैठकीत झालेल्या समन्वयातुन सिन्नर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी सिन्नरवासियांनी चांगल्या प्रतीने प्रतिसाद दिला. त्यामुळे किराणा दुकान, भाजी मार्केट, राष्ट्रीकृत बँका, पतसंस्था व एल.आय.सी. सारखे कार्यालय देखील बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सामाजिक अंतर पाळण्यात यथ मिळाले आहे. 
         आजरोजी एकोणावीस करोना रूग्णांना घरी सोडण्यात आले असुन, काल चौदा जणांना घरी सोडण्यात आले आहे. व नविन करोना रूग्णांची वाढ नसल्याने शहर वासियांनी समाधान व्यक्त करत यापुढेही लॉकडाऊन अशाच पध्दतीने दि. ४ ऑगस्ट पर्यंत पाळण्यात येईल, असे आश्वासन तहसिलदार यांना दिले आहे. सिन्नरच्या उपजिल्हा रूग्णालयात व इंडीया बुल्स येथे तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये मिळुन ६५ रूग्ण उपचार घेत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA